Sa Re Ga Ma Pa Winner: पश्चिम बंगालची निलांजना राय झी टीव्हीच्या 'सा रे ग म प'ची विजेती, ट्रॉफीसह 10 लाख रुपये बक्षीस
सारेगमपा ट्रॉफी जिंकल्यानंतर, निलांजना म्हणाली, “सा रे ग म पा 2021 जिंकून मला खूप आनंद झाला आहे आणि माझ्या या प्रवासात मला मिळालेल्या कौतुक आणि प्रेमाबद्दल मी प्रेक्षकांची अत्यंत आभारी आहे.
'झी टीव्ही'च्या (Zee TV) 'सा रे ग म प 2021' या (Sa Re Ga Ma Pa 2021 Winner) सिंगिंग रिअॅलिटी शोला या सीझनचा विजेता मिळाला आहे. सर्वाधिक मतांसह पश्चिम बंगालच्या नीलांजना (Neelanjana Ray) ही या पर्वाची विजेती ठरली आह. 'सा रे ग म प'च्या प्रतिष्ठित ट्रॉफीसोबतच नीलंजनाला रोख बक्षीस म्हणून 10 लाख रुपयांचा धनादेशही देण्यात आला आहे. संगीताच्या प्रत्येक आव्हानाला तोंड देत, निलांजना खडतर स्पर्धा देणारे राजश्री बाग (Rajshree Bagh) आणि शरद शर्मा (Sharad Sharma) यांना शोचे प्रथम आणि द्वितीय उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले. राजश्रीला निर्मात्यांकडून 5 लाख रुपये, तर शरद शर्माला 3 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.
सारेगमपाचा संपूर्ण अनुभव माझ्यासाठी खूप समृद्ध करणारा
सारेगमपा ट्रॉफी जिंकल्यानंतर, निलांजना म्हणाली, “सा रे ग म पा 2021 जिंकून मला खूप आनंद झाला आहे आणि माझ्या या प्रवासात मला मिळालेल्या कौतुक आणि प्रेमाबद्दल मी प्रेक्षकांची अत्यंत आभारी आहे. हा माझ्यासाठी असा क्षण आहे जो मी कधीही विसरणार नाही आणि मला अजूनही विश्वास बसत नाही की हा अद्भुत प्रवास संपला आहे. सारेगमपाचा संपूर्ण अनुभव माझ्यासाठी खूप समृद्ध करणारा आहे.”
जाणून घ्या निलांजना यांचे काय म्हणणे आहे
निलांजना पुढे म्हणते की, या प्रवासात मला आमच्या जज, मार्गदर्शकांकडून खूप काही शिकायला मिळाले आणि आमच्या शोच्या सर्व ज्युरी सदस्यांनी दिलेला अभिप्राय खूप प्रेरणादायी आहे. पण, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी या व्यासपीठावर घालवलेले सर्व मौल्यवान क्षण मी जपून ठेवीन. माझ्या सहकारी स्पर्धकांशी जोडले गेल्याने मला खूप आनंद होतो. आमच्या सेटवरील प्रत्येकजण माझ्यासाठी कुटुंबातील सदस्यासारखा आहे आणि मला स्वतःला सिद्ध करण्याची ही संधी दिल्याबद्दल मी झी टीव्हीचे आभार मानू इच्छिते
दमदार कामगिरीने सुरुवात
सा रे ग म प निलांजनाच्या महाअंतिम फेरीत, राजश्री आणि शरद यांनी जबरदस्त परफॉर्मन्स लोकांसमोर सादर केले, तसेच सा रे ग म प 2021 च्या महाअंतिम फेरीत इतर स्पर्धकांच्या मनमोहक आणि भावपूर्ण गायनाने भरले होते. ग्रँड फिनालेची सुरुवात शोच्या टॉप सहा फायनलिस्ट - निलांजना राय, शरद शर्मा, राजश्री बाग, संजना भट्ट, अनन्या चक्रवर्ती आणि स्निग्धाजित भौमिक यांच्या पॉवर-पॅक गाण्यांनी झाली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)