Tunisha Sharma Death Case: टीवी अभिनेत्री टुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी सहकलाकार Sheezan Khan आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक

Sheezan Khan वर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोप केला आहे. कलम 306 अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Tunisha Sharma Death Case: टीवी अभिनेत्री टुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी सहकलाकार Sheezan Khan आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक
Tunisha Sharma With Ali Baba Co-Star Sheezan Khan (Photo Credits: Instagram)

अवघ्या 20 वर्षीय अभिनेत्री टुनिशा शर्मा (Tunisha Sharma) हीने मालिकेच्या सेटवर गळफास घेत जीवन संपवल्याची घटना सुन्न करणारी आहे. दरम्यान टुनिशाच्या आत्महत्येमध्ये तिचा सहकलाकार Sheezan Khan ला अटक करण्यात आली आहे. वाळीव पोलिसांनी ही कारवाई केली असून Sheezan Khan वर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोप केला आहे. कलम 306 अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आज शीझान ला कोर्टात दाखल केले जाणार आहे.

Ali Baba: Daastan-E-Kabul मालिकेच्या सेट वर टुनिशाने आत्महत्या केली आहे. या मालिकेच्या सेटवर Sheezan Khan देखील होता. त्याच्याच मेकअप रूम मध्ये टुनिशाने आत्महत्या केली. Sheezan Khan सोबत टुनिशा रिलेशनशिपमध्ये होती. तिच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी Sheezan Khanला अटक केली आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

पहा ट्वीट

वाळीव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टुनिशाच्या आत्महत्या प्रकरणी हत्या आणि आत्महत्या अशा दोन्ही बाजूने तपास केला जाणार आहे. टूनिशा गरोदर होती का? या प्रश्नी त्यांनी उत्तर देणं टाळलं आहे. ते पोस्ट मार्टम आणि वैद्यकीय रिपोर्ट्स समोर आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Dec 25, 2022 09:13 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).