The Kapil Sharma Show होणार बंद? कपिल शर्मामुळे निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

कपिलने अशा कोणत्याही बातमीला अधिकृत दुजोरा दिला नसला तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार हा शो लवकरच ऑफ एअर होणार आहे.

The Kapil Sharma Show (PC - Facebook)

The Kapil Sharma Show Off Air: द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) च्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ताज्या बातम्यांनुसार, हा शो लवकरच बंद होऊ शकतो. हे ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल, याचे कारण दुसरे कोणी नसून खुद्द कपिल शर्मा (Kapil Sharma) आहे. अलीकडेच कपिल शर्मा 'द कश्मीर फाइल्स' च्या टीमला प्रमोशनसाठी शोमध्ये आमंत्रित न केल्यामुळे वादात सापडला होता.

कपिल शर्माने नुकतीच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने कॅनडा दौऱ्याची माहिती चाहत्यांशी शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत कपिलने लिहिले- 'मला 2022 च्या माझ्या यूएस-कॅनडा टूरची घोषणा करताना खूप आनंद होत आहे, लवकरच भेटू.' (हेही वाचा- 'The Kashmir Files करमुक्त करण्याऐवजी, विवेक अग्निहोत्रीने आपला चित्रपट YouTube वर अपलोड करावा' - Arvind Kejriwal (Watch Video))

या पोस्टनंतर सोशल मीडियावर कपिलचा शो लवकरच संपणार असल्याच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या आहेत. कपिलने अशा कोणत्याही बातमीला अधिकृत दुजोरा दिला नसला तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार हा शो लवकरच ऑफ एअर होणार आहे. कपिल शर्मा शोचे निर्माते शोचे प्रसारण बंद करणार आहेत. दुसरीकडे, कॉमेडियन त्याच्या कॉमेडी शोमधून एक छोटा ब्रेक घेईल आणि त्याच्या इतर व्यावसायिक वचनबद्धतेची पूर्तता करून लवकरच परत येईल, असंही म्हटलं जातयं.

पिंकविलाच्या मते, 'कपिलने अलीकडेच यूएसए आणि कॅनडा टूरची घोषणा केली आहे. जी जूनमध्ये सुरू होईल आणि जुलैच्या सुरुवातीपर्यंत चालेल. त्यामुळे कपिल यात व्यस्त असेल. याशिवाय त्याच्याकडे इतरही काही कामाच्या कमिटमेंट्स आहेत आणि हे सर्व हातात घेऊन त्याने शोमधून थोडा ब्रेक घेऊन काही महिन्यांनंतर नवीन सीझन घेऊन परतण्याचा विचार केला आहे.