Suraj Chavan Blessed With Baby Girl: सूरज चव्हाण च्या घरी जन्माष्टमी दिवशी 'लक्ष्मी'चं आगमन; झाला लेकीचा बाबा

बिग बॉस मराठी सीझन ५ चा विजेता सूरज चव्हाण बाबा झाला असून पत्नी संजनाने जन्माष्टमीच्या शुभदिनी मुलीला जन्म दिला आहे. रुग्णालयातील पहिला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Suraj Chavan Blessed With Baby Girl: सूरज चव्हाण च्या घरी जन्माष्टमी दिवशी 'लक्ष्मी'चं आगमन; झाला लेकीचा बाबा
Suraj Chavan Blessed with Baby Girl

'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) बाबा झाला आहे. सूरजची पत्नी संजना हीने जन्माष्टमीच्या दिवशी मुलीला जन्म दिला आहे. डिसेंबर 2025 मध्ये सूरज आणि संजना विवाहबद्ध झाले होते. लग्नाच्या 9 महिन्यानंतर आता त्यांच्या आयुष्यात चिमुकली दाखल झाली आहे. लेकीच्या जन्मानंतर सूरज चव्हाणचा रुग्णालयातील पहिला व्हिडिओ समोर आला आहे.  त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सूरजच्या एका चाहत्याने रुग्णालयातून शेअर केलेल्या या व्हिडिओत, बाळाला पाहण्यासाठी रुग्णालयातील स्टाफ आणि चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसते आहे.

सूरज चव्हाण झाला लेकीचा बाबा

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rudra Vetal (@vetal7379)

काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री जान्हवी किल्लेदारने संजनाच्या चोरओटी भरण्याच्या कार्यक्रमाचा आणि नंतर डोहाळे जेवणाचा व्हिडिओ अपलोड करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली होती. त्यानंतर सूरजनेही त्याच्या आयुष्यातील ही गोड बातमी शेअर केली होती. दरम्यान सूरज-संजनाला कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नक्की वाचा: अभिनेत्री तेजस्विनी लोणारी-समाधान सरवणकर झाले आई-बाबा! आत्या प्रिया सरवणकर यांनी शेअर केली गूड न्यूज .

सूरज चव्हाण हा सोशल मीडीया मध्ये इन्फ्लुएंसर आहे. बिग बॉस मराठी  5 मध्ये त्याने प्रवेश करत विजेतेपद मिळवले. 'गुलिगत', ‘झापुक झुपूक’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सूरजने मराठी चित्रपटामध्येही काम केले मात्र केदार शिंदे दिग्दर्शित हा सिनेमा बॉक्सऑफिस वर मात्र आपली चमक दाखवू शकला नाही. दरम्यान बारामतीच्या सूरज चं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एनसीपी नेते अजित पवार यांनी मदत केली होती. त्यानंतर दिमाखात उभ्या राहिलेल्या सूरजच्या घराचेही फोटोज सोशल मीडीयात वायरल झाले होते.

(The above story first appeared on LatestLY on Sep 05, 2026 03:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).