अभिनेत्री तेजस्विनी लोणारी-समाधान सरवणकर झाले आई-बाबा! आत्या प्रिया सरवणकर यांनी शेअर केली गूड न्यूज
तेजस्विनीने मुलाला जन्म दिल्याची गोड बातमी आत्या प्रिया सरवणकर यांनी शेअर केली आहे. सध्या सरवणकर कुटुंबाममध्ये आनंदाचं वातावरण आहे.
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari)-समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar) यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. तेजस्विनीने मुलाला जन्म दिल्याची गोड बातमी आत्या प्रिया सरवणकर यांनी शेअर केली आहे. सध्या सरवणकर कुटुंबाममध्ये आनंदाचं वातावरण आहे. डिसेंबर 2025 मध्ये तेजस्विनी लोणारी-समाधान सरवणकर मुंबई मध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विवाहबद्ध झाले होते. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. दरम्यान लग्नानंतर आता 8-9 महिन्यांतच त्यांनी चाहत्यांना गूड न्यूज दिल्याने त्यांच्या चाहत्यांना अजून एक सुखद धक्का बसला आहे.
समाधान सरवणकर यांचे वडील सदा सरवणकर हे माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. सदा सरवणकर यांनी दीर्घकाळ या परिसरात राजकीय काम केले असून माहीमच्या राजकारणात सरवणकर कुटुंबाचा प्रभाव राहिला आहे.
2026 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत समाधान सरवणकर यांना प्रभाग क्रमांक 194 मधून पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीनंतर त्यांनी आपल्या पराभवासाठी भाजपच्या स्थानिक यंत्रणेवर आरोप केले होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळले होते.
प्रिया सरवणकर यांची पोस्ट
View this post on Instagram
समाधान-तेजस्विनीच्या आयुष्यात बाळाचं आगमन
View this post on InstagramA post shared by Samadhan Sadanand Sarvankar (@samadhansarvankarofficial)
तेजस्विनी लोणारी ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. तेजस्विनी 'तुझेच मी गीत गात आहे’, ‘देवमाणूस 2’ आणि ‘बिग बॉस मराठी 4’ यामधून रसिकांसमोर आली होती. लग्नानंतर तेजस्विनी सिनेमा, सिरीअल्स पासून दूर राहिली आहे. तेजस्विनीवर आता नव्या आयुष्याच्या प्रवासासाठी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 22, 2026 03:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

