Shweta Tiwari चा नवरा अभिनव कोहलीने धाडली कायदेशीर नोटीस, मुलाला भेटता येत नसल्याच्या कारणास्तव नाराज

Shweta Tiwari चा नवरा अभिनव कोहलीने धाडली कायदेशीर नोटीस, मुलाला भेटता येत नसल्याच्या कारणास्तव नाराज
श्वेता तिवारी आणि अभिनव कोहली (Image Credit: Instagram)

टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा नवरा अभिनव कोहली यांच्यामध्ये सध्या वाद सुरु आहेत. नुकत्याच अभिनव यांनी श्वेता हिच्यावर आपल्या मुलाल भेटण्यास देत नसल्याचा आरोप लगावला आहे. त्यानंतर अभिनव याने श्वेता हिच्या सोबत झालेल्या बातचीतचे ही स्क्रिनशॉट सोशल मीडियात शेअर केले आहेत. तेथे त्याने आपल्या मुलाला भेटण्यासाठी मागणी केली आहे. तर श्वेता हिच्याकडून याबद्दल कोणतेच उत्तर देण्यात आलेले नाही. अशातच अभिनव याने कायद्याचा आधार घेतला असून तिला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.(Mumbai Police Summons Kangana Ranaut: मुंबई पोलिसांकडून कंगना रनौत हिच्यासह बहिण रंगोली चांडेल यांना समन्स, 10 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश)

इंडिया टुडे सोबत बातचीत करताना अभिनव याने असे म्हटले की, श्वेता हिला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. जर श्वेता हिने यावर कोणतेच उत्तर 14 दिवसात दिले नाही तर हे प्रकरण पुढे घेऊन जाणार आहे. त्याचसोबत श्वेता आपल्या पब्लिक इमेजचा आधार घेत त्याला दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सुद्धा अभिनव याने लावला आहे. तसेच त्याने पुढे असे ही म्हटले की, आज मी एकटा पडलो आहे. मी माझ्या मुलापासून दूर आहे. कारण श्वेता एक सेलिब्रेटी असून माझी इमेज खराब करत आहे.(Fatima Sana Shaikh: वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला; बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख हिचे वक्तव्य)

दरम्यान, श्वेता तिवारी गेल्या महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आली होती. त्यावेळी तिने अभिनव याच्याकडे मुलाला सोडले होते. अभिनव याने असा आरोप लावला आहे की, 25 ऑक्टोंबरला श्वेता ही त्याला घेऊन गेली. मात्र एका आठवड्यानंतर मुलगा भेटला पण श्वेता हिने त्याला काही वेळानंतर अभिनव पासून दूर केले. तर श्वेता हिने आपल्या नवऱ्याच्या विरोधात घरगुती हिंसाचाराप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तर अभिनव याने बहुतांश वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला मुलगा आणि श्वेता संबंधित काही गोष्टी बोलून दाखवल्याचे दिसून आले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 03, 2020 06:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).