Shweta Tiwari हिची तब्येत बिघडल्यानंतर पती अभिनव याने फिगर मेंन्टेंन करण्याच्या नादात झाल्याचे म्हणत मारले टोमणे

त्यामुळे उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्वेता तिवारी न अभिनव कोहली (Photo Credits: Instagram)

टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिची अचानक तब्येत बिघडली आहे. त्यामुळे उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वेता हिची प्रकृती बिघडल्याची जशी बातमी समोर आली तेव्हा तिचा पती अभिनव कोहली याने सोशल मीडियात एक पोस्ट केली. तिच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करण्याऐवजी त्याने तिला टोमणे मारले आहेत.

सोशल मीडियात खुप अॅक्टिव्ह असणारी श्वेता तिवारी हिने पुस्तक वाचतानाचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहून चाहत्यांना चिंता वाटू लागली. यावरुन प्रश्न सुद्धा विचारले गेले. त्यानंतर श्वेता तिवारी हिच्या टीमने एका विधानात असे म्हटले की, ती ठिक असून सध्या रिकव्हर होत आहे. बदललेल्या वातावरणामुळे तिला थकवा आणि लो ब्लड प्रेशरची समस्या उद्भवली. त्यामुळे रुग्णालयात भरती करावे लागले.(अमिताभ बच्चन यांना NGO चे पत्र, पान मसाला जाहिरात न करण्याचे आवाहन)

यावरुनच अभिनव कोहली याने तिला टोमणे मारले आहेत. त्याने असे म्हटले की, माझ्यामध्ये आणि मुलामध्ये एकमेकांना भेटण्यासह एकत्रित राहण्यासंदर्भात कोर्टात वाद सुरु आहेत. देव करो श्वेता लवकरत बरी होऊ दे. पुढे असे म्हटले की, कलाकार सर्वांच्या समोर सर्वात सुंदर दिसण्यासाठी, सर्वांचे प्रेम मिळावे यासाठी गरजेपेक्षा अधिक फिगर मेंन्टेन करतात. कमीत कमी खाण खातात. त्यामुळे त्यांना थकवा येतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhinav Kohli (@abhinav.kohli024)

दरम्यान, श्वेता तिवारी ही खतरो के खिलाडी मध्ये दिसून आली होती. त्यानंतर आता बिग बॉस 15 मध्ये सुद्धा दिसून येणार आहे. तिच्या या वस्त शेड्युलमुळे श्वेता तिवारी हिची तब्येत बिघडली आहे. दुसऱ्या बाजूला श्वेता आपल्या फिटनेसकडे सुद्धा खुप लक्ष देते.