Lata Mangeshkar यांच्याकडून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुले ला खास भेटवस्तू; 'थिजून जाणं म्हणजे काय' याचा अनुभव आल्याच्या व्यक्त केल्या भावना

असं समीर ने म्हटलं आहे.

समीर चौघुले । PC: Instagram

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'(Maharashtrachi Hasyajatra) मधून घराघरात पोहचलेल्या समीर चौघुलेचा (Sameer Chaughule) आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच समीर चौघुलेला खुद्द भारताची गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्याकडून कौतुकाची थाप आणि एक खास भेटवस्तू मिळाली आहे. समीरने त्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत मनातील भावना मोकळ्या केल्या आहेत.

' लता मंगेशकर महाराष्ट्राची हास्यजत्रा नेहमी बघतात आणि खूप हसतात....एन्जॉय करतात ही आम्हा महाराष्ट्राची हास्यजत्रा कुटुंबियांसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. हा सुवर्ण क्षण आयुष्यात आला तो फक्त आणि फक्त आमच्या हास्यजत्रा कुटुंबामुळे..' असं म्हणत समीरने लता मंगेशकर यांनी समीर साठी पाठवलेली वस्तू आणि त्याच्या गिफ्ट कार्डवरील मेसेजचा फोटो पोस्ट केला आहे. नक्की वाचा: लता मंगेशकर यांच्याकडून Mozart's 40th Symphony भारतीय सरगम मध्ये सादर करणार्‍या Samadipta Mukherjee च्या पाठीवर कौतुकाची थाप अन आशिर्वाद! 

समीर चौघुलेची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

लता मंगेशकर दीदींनी अत्यंत प्रेमाने घरी एक भेटवस्तू आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी पाठवली. आणि ती ट्रॉफी म्हणजे दिदींच्या हस्ताक्षरातील शुभेच्छा आणि आशीर्वाद....थिजून जाणं म्हणजे काय ते आज मला कळलं.. अशा शब्दांत त्याने या भेटवस्तूवर आपल्या भावना मांडल्या आहेत. दरम्यान समीर चौघुलेने त्याची कार्यक्रमातील पार्टनर विशाखा सुभेदारचे देखील आभार मानले आहे.

काही महिन्यांपूर्वी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ची टीम केबीसी च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्यादेखील भेटीला गेली होती. त्यावेळी देखील बीग बींनी समीरच्या कामाला दाद दिली होती.