अजय देवगणसाठी उखाणा घेण्याची लग्नात हुकलेली संधी काजोलने इंडियन आयडॉल 10च्या मंचावर साधली !

सिंगल मदरची भूमिका काजोल 'हेलीकॉप्‍टर इला' या सिनेमामध्ये साकारत आहे.हा सिनेमा रसिकांच्या भेटीला 12 ऑक्टोबर 2018 ला येणार आहे.

काजोल - अजय देवगण Photo Credits Facebook

काजोलने बॉलिवूड मध्ये काही निवडकचं कामं केली आहेत पण तिची ओळख तिने केलेल्या भू मिकांमुळे प्रकर्षाने लक्षात राहते. लवकरच काजोल 'हॅलिकॉप्टर इला ' चित्रपटातून पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन साठी काजोल आणि अजय देवगण इंडियन आयडॉल शो मध्येही आले होते. या शो मध्ये चक्क मराठीत काजोलने अजयच्या नावाचा उखाणा घेतला आहे.

काजोल आणि अजय देवगणचं लग्न मराठमोळ्या पद्धतीने झालं. महाराष्ट्रीयन लग्नामध्ये उ खाणा घेण्याची पद्धत आहे. लग्नात अजयासाठी काजोल ने उखाणा घेतला नव्हता मात्र इंडियन आयडॉलच्या सेट्सवर स्पर्धक अवंती पटेलने काजोलला लग्नात उखाणा घेतला होता का ? असं विचारलं .. तेव्हा लग्नात घेतला नव्हता पण आता घेते असं म्हणतं आपल्या खास शैलीत उखाणा घेतला.

हेलीकॉप्‍टर इला'

17 वर्षीय मुलाच्या सिंगल मदरची भूमिका काजोल 'हेलीकॉप्‍टर इला' या सिनेमामध्ये साकारत आहे. राष्‍ट्रीय पुरस्‍कार विजेता बंगाली अभिनेता ऋद्धि सेन या चित्रपटात काजोलच्या मुलाची भूमिका साकारत आहे. काजोल, ऋद्धि सोबत अभिनेत्री नेहा धुपिया या चित्रपटामध्ये खास भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगणने या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर प्रदीप सरकारचं दिग्दर्शन आहे. हा सिनेमा रसिकांच्या भेटीला 12 ऑक्टोबर 2018 ला येणार आहे.