छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मोना सिंह अडकली विवाहबंधनात; बँकर असलेल्या बॉयफ्रेंडशी केले लग्न (Photos)

तर छोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय अभिनेत्री आज, 27 डिसेंबर, 2019 रोजी विवाहबंधनात अडकली आहे.

Mona Singh (Photo Credits: Instagram)

‘जस्सी जैसी कोई नहीं’ (Jassi Jaissi Koi Nahin) या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले नाव म्हणजे मोना सिंह (Mona Singh). तर छोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय अभिनेत्री आज, 27 डिसेंबर, 2019 रोजी विवाहबंधनात अडकली आहे. आपल्या इन्व्हेस्टमेंट बँकर बॉयफ्रेंड श्याम गोपालन याच्यासोबत अगदी पारंपारिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला.

सध्या सोशल मिडीयावर या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. काल मोनाचा मेहंदी समारंभ पार पडला. लग्नाच्या विधींमध्ये कुटुंबातील सदस्य आणि मित्र सामील झाले होते. टीव्ही इंडस्ट्रीचे अनेक मित्र लग्नापूर्वी मोनाच्या बॅचलर पार्टीमध्येही दिसले होते.

 

View this post on Instagram

 

Actress #MonaSingh ties knot with her boyfriend #Shyam . . . . . . #TellyTalk #MonaSingh #actress #wedding #weddingpictures #tvceleb #celebrity

A post shared by Telly Talk (@tellytalkindia) on

मोना सिंह नववधू ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. लाल जोडा आणि कलीरे घातलेली मोना अगदी एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहे. मोना सिंहने आपल्या लग्नाचा समारंभ अतिशय खासगी ठेवला होता. तिला मीडिया अटेंशन नको होते त्यामुळे या लग्नाबद्दल अनेक लोकांना माहित नव्हते. मोना सिंहचे नाव यापूर्वी टीव्ही अभिनेता करण ओबेरॉय आणि चित्रपट अभिनेता विद्युत जामवाल यांच्याशी जोडले गेले होते. मात्र आता मोनाचे लग्न बँकर असलेल्या  श्यामशी झाले आहे. (हेही वाचा: सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिला आदित्य नारायण याने ऑनसेट घातली लग्नाची मागणी; पाहा व्हायरल व्हिडिओ)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amandeep Singh Narang (@narangamandeepsingh) on

 

View this post on Instagram

 

#Exclusive : Mona Singh gets hitched♥️ Here's exclusive pictures of the actress in her red wedding trousseau as she looks impeccable Heartiest congratulations to the couple. . . . @monajsingh #monakishaadi #monasingh #monshy #love #telly #celebrity #weddingseason #wedding #red #lehenga #indiaforumstelly #indiaforums #ifexclusive

A post shared by India Forums (@indiaforums) on

श्याम आणि मोना हे दोघेही बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. हे लग्न पंजाबी रीतीरिवाजांनी पार पडले. मोना सिंहने श्यामबद्दल मिडियामध्ये फारसे काही सांगितले नाही, आता आज हे दोघे सात जन्मांच्या बंधनात कायमचे बांधले गेले. मोना सिंहचा जन्म 8 ऑक्टोबर 1981 पुणे, येथे झाला. मोना सिंहने अभिनयाची सुरुवात 2003 मध्ये 'जस्सी जैसी कोई नहीं' अशा हिट शोपासून केली. त्यानंतर 2006 मध्ये तीने रियालिटी शो 'झलक दिखला जा' जिंकला होता.