Bharti Singh पाठोपाठ पती Haarsh Limbachiyaa ला देखील NCB कडून अटक; दोघांनीही दिली गांजा ओढल्याची कबुली
प्रसिद्ध विनोदी कलाकार भारती सिंह (Comedian Bharti Singh) पाठोपाठ तिचा पती हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) याला देखील NCB ने अटक केली आहे.दोघांना आज दोघांनाही NDPS Court समोर दाखल केले जाईल.
प्रसिद्ध विनोदी कलाकार भारती सिंह (Comedian Bharti Singh) पाठोपाठ तिचा पती हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) याला देखील NCB ने अटक केली आहे. भारती सिंहला काल तर आज (22 नोव्हेंबर) च्या सकाळी तिच्या पतीला देखील अटक झाली आहे. दरम्यान भारती आणि हर्षच्या घरामध्ये अंमली पदार्थ असल्याचं आढळलं होतं. त्यानंतर त्यांची चौकशी झाली. पुढे चौकशीमध्ये त्यांनी ड्रग्सचं सेवन केल्याचेही कबुल केल्याची माहिती देण्यात आली आहे.
शनिवारी (21 नोव्हेंबर) दिवशी भारती आणि हर्षच्या मुंबईतील अंधेरी, वर्सोवा, लोखंडवाला परिसरात त्यांच्या घरांमध्ये एनसीबी टीम्सकडून धाड टाकण्यात आली होती. दरम्यान एनसीबीच्या ताब्यात असलेल्या काही ड्र्ग्स पेडलर्सकडून त्यांच्या नावांचा उल्लेख झाल्यानंतर काल सकाळी छापेमारी झाली आहे. Drugs Case: कॉमेडियन भारती सिंह हिला NCB कडून अटक, ड्रग्ज प्रकरणी छापेमारी केल्यानंतर केला मोठा खुलासा.
ANI Tweet
एएनआय वृत्तसंस्थेच्या ट्वीटनुसार, एनसीबीने भारती सिंगचं घर आणि प्रोडक्शन ऑफिसमध्ये काल छापेमारी केली तेव्हा त्यांना 86.5 ग्राम गांजा आढळला. दोघांनीही गांजा ओढल्याची कबुली एनसीबी टीम्सकडे केली आहे. आता अटकेनंतर दोघांना आज दोघांनाही NDPS Court समोर दाखल केले जाईल. ड्रग्ज प्रकरणात भारती सिंहला अटक झाल्यानंतर सोशल मिडियावर कपिल शर्मा ट्रोल, पहा ट्वीट्स.
'The Kapil Sharma Show'या कॉमेडी शो मध्ये भारती सिंह सहभागी आहे. तर हर्ष आणि भारती सध्या टेलिव्हिजनवर India's Best Dancer चं सूत्रसंचलनदेखील करत आहेत.