बिग बॉसकडून मेघा धाडेला मिळालेल्या घराचे खास फोटो !
पहा मेघाच्या घराचे हे खास फोटो
काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठीचा पहिला सीझन पार पडला. मराठी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींनी यामध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये टास्क, भांडणं यामुळे अनेकदा चर्चेमध्ये होता. मात्र बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतल्यापासून पहिल्या दिवसापासूनच मेघा धाडे चर्चेमध्ये होती.
मेघा धाडेची खास पोस्ट
बिगबॉसचा पहिला सीझन जिंकलेली मेघा धाडे निर्माती आणि अभिनेत्री आहे. सुपरस्टार चित्रपटाची निर्मिती मेघाने केली होती. त्यानंतर एका जबर अपघातामुळे सिनेसृष्टीपासून दूरावलेल्या मेघाची बिग बॉसमध्ये ग्रॅन्ड एन्ट्री झाली. या शोनंतर मेघाचं आयुष्य बदललं आहे. बिग बॉस मराठी विजेत्याला बक्षीसाच्या स्वरूपात एक घर मिळालं आहे. मेघाने तिच्या चाहत्यांसोबत बिग बॉसच्या विजेतेपदावर नाव कोरलेल्यानंतर मिळालेल्या घराचे काही फोटो शेअर केले आहेत.
सोशल मीडियावर मेघाच्या फॅन्सचा दबदबा
बिग बॉसच्या सार्याच स्पर्धेकांना प्रेक्षकांकडून प्रेम मिळालं परंतू सोशल मीडियावर मेघा धाडेच्या पाठिशी अनेकजण उभे राहिले. त्यामुळे सोशल मीडियावर मेघाच्या फॅन्सचा खास दबदबा आहे.
बिग बॉसच्या घरात मेघा धाडे, सई लोकूर आणि पुष्कर जोग हे त्रिकुट एकत्र फारच लोकप्रिय झालं होतं. मात्र स्पर्धेच्या अंतिम टप्प्यावर आल्यानंतर या तिघांमध्ये मतभेद झाले. बिग बॉसनंतर मेघा कोणत्या माध्यामातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे? याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मात्र सध्या बिग बॉस विजेती मेघा आनंदात आहे.