Bigg Boss OTT आजपासून सुरु; करण जौहर चा घरात प्रवेश (Watch Video)

आजपासून हा लोकप्रिय शो ओटीटी प्लॅटफॉर्म वूटवर सुरु होत आहे. 8 ऑगस्ट रात्री 8 वाजता बिग बॉस ओटीटी ला सुरुवात होईल.

Karan Johar (Image Credits: Instagram)

बिग बॉस (Bigg Boss) च्या चाहत्यांची प्रतिक्षा आता संपत आली आहे. आजपासून हा लोकप्रिय शो ओटीटी प्लॅटफॉर्म वूटवर सुरु होत आहे. 8 ऑगस्ट रात्री 8 वाजता बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) ला सुरुवात होईल. त्यानंतर महिनाभर हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. बिग बॉस ओटीटी हा शो करण जौहर (Karan Johar) होस्ट करत असून त्याने घरात प्रवेश केला आहे. याचा एक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्याने करणला झालेला आनंद दिसून येत आहे.

यात करण जौहर बिग बॉसच्या घरात दिसत आहे. सुंदर, आकर्षक घर तो डोळे भरुन पाहत आहे आणि याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे. तसंच अजून प्रतिक्षा करु शकत नसल्याचे करण या व्हिडिओत म्हणत आहे. (Bigg Boss OTT: बिग बॉसच्या नव्या घराची झलक; पहा व्हिडिओ)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

(Bigg Boss OTT First Promo: सलमान खान चा रियालिटी शो 'बिग बॉस ओटीटी'चा प्रोमो आऊट, Watch Video)

करण जौहर बिग बॉसचा मोठा चाहता आहे. त्याच्या आईला देखील हा शो भयंकर आवडतो. त्यामुळे हा शो होस्ट करणे करणसाठी स्वप्नपूर्ती प्रमाणे आहे. या शोमध्ये सुरक्षित असलेले स्पर्धक सलमान खान च्या बिग बॉस 15 मध्ये थेट प्रवेश करतील. बिग बॉस टीव्हीवर सुरु होण्याच्या 6 आठवडे आधी बिग बॉस ओटीटी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.