Bigg Boss 14: मराठी विरोधी वक्तव्यामुळे बिग बॉस स्पर्धक जान कुमार सानू वादात; शिवसेना खासदार प्रताप सरनाईक यांनी दिला इशारा

शिवसेना खासदार प्रताप सरकनाईक यांनी आपल्या ट्विटमध्ये इशारा देत म्हटले आहे की, 'Big Boss मालिकेचे शूटिंग महाराष्ट्रात होते, मराठी लोकांमुळे TRP वाढतो त्याच महाराष्ट्राच्या मराठीचा अवमान मालिकेतल्या जान कुमार सानूने केला हे कदापि खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात करियर घडवलेल्या गायक कुमार सानुचा मुलगा मराठीचा द्वेष व अनादर करत असेल तर हे सहन केले जाणार नाही'.

Bigg Boss 14:  मराठी विरोधी वक्तव्यामुळे बिग बॉस स्पर्धक जान कुमार सानू वादात;  शिवसेना खासदार प्रताप सरनाईक यांनी दिला इशारा
Pratap Sarnaik | (Photo Credits: Facebook)

बिग बॉस 14 (Bigg Boss 14) मध्ये स्पर्धक असलेला गायक जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu) वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. बिगबॉसच्या घरात साून याने मराठी भाषेबद्दल अवमानकारक शब्द काढले. जान सानू याचे उद्गार गांभीर्याने घेत मनसे (MNS) आणि शिवसेना (Shiv Sena) आक्रमक झाली आहे. शिवसेना खासदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, 'महाराष्ट्रात करियर घडवलेल्या गायक कुमार सानुचा मुलगा मराठीचा द्वेष व अनादर करत असेल तर हे सहन केले जाणार नाही.' दरम्यन, मनसे नेते अमेय खोपकर यांनीही सानू याला इशारा देत 'मुंबईत करीअर कसे करतो तेच बघतो' अशा इशारा दिला आहे.

शिवसेना खासदार प्रताप सरकनाईक यांनी आपल्या ट्विटमध्ये इशारा देत म्हटले आहे की, 'Big Boss मालिकेचे शूटिंग महाराष्ट्रात होते, मराठी लोकांमुळे TRP वाढतो त्याच महाराष्ट्राच्या मराठीचा अवमान मालिकेतल्या जान कुमार सानूने केला हे कदापि खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात करियर घडवलेल्या गायक कुमार सानुचा मुलगा मराठीचा द्वेष व अनादर करत असेल तर हे सहन केले जाणार नाही'.

प्रताप सरनाईक ट्विट

दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटले आहे की, मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी.लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं. (हेही वाचा, Bigg Boss 14: 'आम्ही मराठी तुला लवकरच तुला थोबडवणार', मनसे नेते अमेय खोपकर यांचा बिगबॉस स्पर्धकाला इशारा)

अमेय खोपकर ट्विट

दरम्यान, शिवसेना खासदार प्रताप सरनाईक आणि मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिलेल्या इशारा आणि ट्विटनंतर कलर्स वाहिनीकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आले नाही. परंतू, येत्या काही काळातय हा वाद वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंगना रानौत या अभिनेत्रीने नुकतीच मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त कश्मीर असा केला होता. त्यामुळे तापलेले वातावरण अद्यापही कायम आहे. या पार्श्वभूमीवर परप्रांतीय लोकांकडून मुंबई आणि मराठी भाषा यांचा अवमान होत असल्याची भावना अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.

काय घडलं होतं?

बिग बॉस 14 च्या पर्वामद्ये गायक राहुल वैद्य, निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. दरम्यान, निक्की तांबोली ही राहुल वैद्य आणि जान सानू यांच्याशी मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी , ‘माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल’, असे म्हंटले. तसेच, मला मराठी ऐकून चीड येते, असे उद्गार जान सानू याने काढले. त्यावरुन वातावरण पेटण्याची शक्यता आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 28, 2020 12:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).