Ankita Lokhande हिचा नवरा Vikcy Jain चा अभिनयात डेब्यू, लवकरच 'या' शो मध्ये दिसणार दोघांची जोडी

मात्र लवकरच विक्की जैन हा अभिनयात डेब्यू करणार आहे.

Ankita Lokhande with Vicky Jain (Photo Credits: Twitter)

टेलिव्हिजनवरील अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विक्की जैनच्या (Vickey Jain) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण आतापर्यंत पडद्यावर फक्त अंकिता दिसून येत होती पण विक्कीला कोणीही स्क्रिनवर पाहिले नाही. मात्र लवकरच विक्की जैन हा अभिनयात डेब्यू करणार आहे. अंकिताने तिच्या सोशल मीडियावरील अकाउंटवर एका शो चा प्रोमो शेअर केला असून त्यात विक्कीचे या कॅमेऱ्याच्या जगात स्वागत केले आहे. या शो चे 'स्मार्ट जोडी' असे नाव आहे.

प्रोमो शेअर करत अंकिता हिने असे लिहिले की, माहिती नाही की तु कितपत अभिनय करु शकतो. लाइट, कॅमेरा आणि अॅक्शनच्या जगात तुझे स्वागत बेबी. मी निश्चिती व्यक्त करते की, या एकमेकांसोबतच्या प्रवासात आपण मजा करु आणि आठवणी एकत्रित करु ज्या आपल्यासोबत कायम राहतील. याच्यासोबत अंकिताने शो च्या वेळेबद्दल ही माहिती दिली आहे. हा शो प्रत्येक शनिवारी रात्री 8 वाजता स्टार प्लसवर दाखवला जाणार आहे.(Bhabhiji Ghar Par Hain च्या अनिता भाभी उर्फ Neha Pendse चा जिम मधला व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही फुटेल घाम)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

दरम्यान, अंकिता ही अभिनेत्री असल्याने तिला या शोमध्ये काम करताना मुश्किल वाटणार नाही. पण विक्की हा पेशाने व्यावसायिक असून त्याचा हा पहिलाच शो आहे. त्यामुळे पडद्यावर आता कशी भुमिका पार पाडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अंकिता आणि विक्की या दोघांनी गेल्या वर्षात सप्टेंबर महिन्यात लग्न केले होते.