America's Got Talent 2019: मुंबईचा 'V. Unbeatable' ग्रुप 4 थ्या स्थानावर, विजेतेपद हुकल्याने चाहत्यांनी केला आयोजकांवर पक्षपातीपणाचा आरोप
हा सर्व चाहत्यांसाठी धक्का असून या रिअॅलिटी शोच्या आयोजकांनी या पक्षपातीपणा केल्याचा आरोप चाहत्यांनी केला आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेल्या अमेरिका गॉट टॅलेंट 2019 (America's Got Talent 2019) अंतिम सोहळा पार पडला असून 22 वर्षाच्या कोडी ली (Kodi Lee) या तरुणाने विजेतेपद पटकावले. तर युथ चोइर आणि रियान निमिली यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे. या अंतिम सोहळा दिमाखात पार पडला खरा मात् या सोहळ्यातील चाहत्यांसाठी निराशाजनक गोष्ट म्हणजे गेले कित्येक दिवस चर्चेत असलेले मुंबईचा V.Unbeatable ग्रुप या स्पर्धेत 4 थ्या क्रमांकांवर आले. हा सर्व चाहत्यांसाठी धक्का असून या रिअॅलिटी शोच्या आयोजकांनी या पक्षपातीपणा केल्याचा आरोप चाहत्यांनी केला आहे. ट्विटच्या माध्यमातून अशा पद्धतीने त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
अमेरिका गॉट टॅलेंट 2019 मध्ये मुंबईच्या 'व्ही अनबिटेबल' डान्स ग्रुप ने धडक मारताच सर्वांना उत्सुकता लागली ती त्यांच्या अंतिम सोहळ्याची हा सोहळा 18 सप्टेंबर रोजी संपन्न झाला. मात्र विजेतेपदी मुंबईच्या या ग्रुपची वर्णी न लागल्याने चाहत्यांची घोर निराशा झाली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
यात अनेक चाहत्यांचे असे म्हणणे आहे की, या कार्यक्रमाच्या आयोजकांनी पक्षपातीपणा केला असून V Unbeatable ग्रुप हा विजेतेपदाचा मानकरी ठरला पाहिजे होता.
28 मे पासून अमेरिकेत सुरु झालेल्या या शो मध्ये मुंबईच्या 'V Unbeatable' ग्रुपच्या नृत्याने परीक्षकांसह सर्व प्रेक्षकांना अवाक् केले होते. त्यानंतर सोशल मिडियावरील त्यांचा 'बाजीराव मस्तानी' मधील मल्हारी गाण्यावरील नृत्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे जगभरातून या ग्रुपला अंतिम फेरीसाठी शुभेच्छांसह कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र इतका टॅलेंटेंड ग्रुप विजेतेपदावर आपले नाव कोरू न शकल्याने प्रेक्षकांची घोर निराशा झालीय.