Bigg Boss Marathi 1 ची स्पर्धक Jui Gadkari हिने इंडस्ट्रीत कास्टिंगसाठी पैशाची मागणी करणा-या बनावट कॉल्ससंदर्भात शेअर केला व्हिडिओ, चाहत्यांना सतर्क राहण्याचे केले आवाहन
तसेच पैसे देऊन आर्टिस्ट कार्डही कुठे बनवून दिले जात्यामुळे तुमच्याकडे पैशाची मागणी करुन तुम्हाला कास्ट करण्याचे आणि आर्टिस्ट कार्ड बनवून देण्याचे आमिष दाखवणा-या फोन कॉल्स बळी पडू नका. हे सर्व बनावट कॉल्स आहेत.'
बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 1) च्या पहिल्या सिझनमध्ये चर्चेत आलेली नाजूक आवाजाची अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) हिने नवोदित कलाकारांना येणा-या Fraud कॉल्ससंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. जुई गडकरी हिच्या म्हणण्याप्रमाणे तिला गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम (Instagram) आणि फेसबुकवर (Facebook) आम्ही ऑडिशन दिले असून कास्टिंगसाठी आपल्याकडून पैसे मागत असल्याचे संदेश नवोदित कलाकार पाठवत आहे. या सर्वांसह अन्य इच्छुकांना हे बनावट फोन कॉल्स असल्याचे जुई गडकरी हिने सांगितले आहे. त्यामुळे अशा फोन कॉल्स बळी पडू नका आणि आपल्या बँक अकाउंट्सची कुठलीही माहिती देऊ नका असे आवाहन तिने या व्हिडियोच्या माध्यमातून केले आहे.
जुईच्या म्हणण्याप्रमाणे 'तुम्ही जर नवोदित असाल आणि इंडस्ट्रीत येऊन इच्छित असाल तर कास्टिंगसाठी इंडस्ट्रीमध्ये एकाही पैशाची मागणी केली जात नाही. तसेच पैसे देऊन आर्टिस्ट कार्डही कुठे बनवून दिले जात्यामुळे तुमच्याकडे पैशाची मागणी करुन तुम्हाला कास्ट करण्याचे आणि आर्टिस्ट कार्ड बनवून देण्याचे आमिष दाखवणा-या फोन कॉल्स बळी पडू नका. हे सर्व बनावट कॉल्स आहेत.' अभिनेता भरत जाधव 'सुखी माणसाचा सदरा' या नव्या मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर करणार कमबॅक, Watch Promo
जर तुम्ही तुमच्या बँक अकाउंटची माहिती दिलात वा असे बनावट कॉल्स करणा-यांना कोणतीही रक्कम ट्रान्सफर केल्यास तुमचा बँक अकाउंट खाली होऊन तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे सतर्क राहा. पोलिसांशी त्वरित संपर्क साधा असे जुई गडकरी यांनी सांगितले आहे.