अभिनेता भरत जाधव 'सुखी माणसाचा सदरा' या नव्या मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर करणार कमबॅक, Watch Promo
नुकताच नवी मालिका 'सुखी माणसाचा सदरा' या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमो मध्ये भरत जाधव आपला सदरा शोधताना दिसत आहे.
मराठी रंगभूमीसोबत मराठी मालिका, चित्रपटांत स्वत:चा ठसा उमटवणारा अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित कलर्स मराठी (Colors Marathi) वरील 'सुखी माणसाचा सदरा' (Sukhi Mansacha Sadra) या मालिकेतून भरत जाधव पुन्हा एकदा छोटया पडद्यावर आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. केदार शिंदे आणि भरत जाधव यांची ऑफ स्क्रीन जोडी जितकी हिट आहे तितकीच ऑनस्क्रीनही जबरदस्त हिट ठरली आहे. हसा चकटफू आणि घडलय बिघडलंय हे त्यातीलच हिट झालेल्या मालिका. त्यानंतर अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आपल्या भेटीला येणार आहे.
नुकताच नवी मालिका 'सुखी माणसाचा सदरा' या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमो मध्ये भरत जाधव आपला सदरा शोधताना दिसत आहे. सुबोध भावे याच्या कान्हाज मॅजिक निर्मिती संस्थेच्या पहिल्यावहिल्या मालिकेचा प्रोमो आला समोर; सोशल मिडियावरून चाहत्यांना दिली बातमी
मालिकेच्या प्रोमो वरुन या मालिकेत काही वेगळेपण पाहायला मिळणार यात दुमत नाही. केदार शिंदे ने ही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर याबाबत एक व्हिडिओ शेअर करुन 'तुमच्या घराचा आरसा आहे हा!!तुमचं प्रतिबिंब यात दिसेल. सुख मागून मिळत नाही.. पण हक्काच्या माणसाला सांगितलं की, नक्की लाभतं. मी तुमच्या हक्काचा माणूस आहे' असे कॅप्शन लिहिले आहे.
सुखी माणसाचा सदरा ही मालिका दस-याच्या मुहूर्तावर म्हणजेच 25 ऑक्टोबरला कलर्स वाहिनीवर सुरु होणार आहे. या मालिकेत नक्की काय वेगळेपण पाहायला मिळणार आणि केदार आणि भरत ही जोडी पुन्हा हिट ठरणार का हे येत्या 25 ऑक्टोबरलाच कळेल.
(The above story first appeared on LatestLY on Oct 02, 2020 12:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

