Abhidnya Bhave Mehendi Ceremony: अभिज्ञा भावे च्या हातावर चढला मेहंदीचा रंग, पाहा या कार्यक्रमातील धमालमस्तीचे फोटोज, See Pics

अभिज्ञाच्या हातावर मेहुलच्या नावाची मेहंदी रंगली असून या कार्यक्रमाचे फोटोज तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टेटसवर शेअर केले आहेत.

Abhidnya Bhave Mehendi Ceremony (Photo Credits: Instagram)

'खुलता कळी खुलेना' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यासाठी तिचा मेहंदी कार्यक्रम रंगला असून या कार्यक्रमाला मराठीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या मेहंदी सेरेमनीचे फोटोज आणि व्हिडिओज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अभिज्ञा भावे हिचा मेहुल पै (Mehul Pai) याच्यासोबत विवाह होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ते रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर अष्टमी दिवशी मेहुल सोबत अभिज्ञाचा साखरपुडा (Abhidnya Bhave Mehendi Ceremony) देखील झाला. हा कार्यक्रम तिने अगदी साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत केला आणि आता लवरकच अभिज्ञा लग्नबंधनात अडकणार आहे.

अभिज्ञाच्या हातावर मेहुलच्या नावाची मेहंदी रंगली असून या कार्यक्रमाचे फोटोज तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टेटसवर शेअर केले आहेत.हेदेखील वाचा- Abhidnya Bhave Engagement: 'खुलता कळी खुलेना' फेम अभिज्ञा भावे हिचा झाला साखरपुडा, कोण आहे तिचा होणारा नवरा, See Pics

Abhidnya Bhave Mehendi Ceremony (Photo Credits: Instagram)

तिच्या या सेरेमनला रेश्मा शिंदे, श्रेया बुगडे, तेजस्विनी पंडित, मयुरी देशमुख सह अनेकांनी हजेरी लावली होती.

Abhidnya Bhave Mehendi Ceremony (Photo Credits: Instagram)

या सेरेमनीचे अनेक धमालमस्तीचे फोटोज आणि छोटे व्हिडिओज अभिज्ञाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Abhidnya Bhave Mehendi Ceremony (Photo Credits: Instagram)

अभिज्ञा भावे हिचा होणारा नवरा मेहुल पै हा मूळचा मुंबईचा असून 'क्लॉकवर्क्स इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.

Abhidnya Bhave Mehendi Ceremony (Photo Credits: Instagram)

सध्या अभिज्ञा स्टार प्रवाह वरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेत काम करत आहे. नुकतीच तिची या मालिकेत एन्ट्री झाली असून यात ती डॉक्टर तनुजा भारद्वाज हे पात्र साकारत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif