सुरुची अडारकर - पियुष रानडे यांच्या घरी 'घटस्थापने' दिवशी चिमुकल्या पाहुणीचे आगमन; खास पोस्ट द्वारा शेअर केली गूडन्यूज
मराठी अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे यांनी रविवारी इन्स्टाग्रामवर मुलगी झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आलेल्या या बातमीनंतर चाहते आणि मराठी कलाकारांनी शुभेच्छा दिल्या.
मराठी अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे हे आई-बाबा झाले आहेत. या जोडप्याने रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून मुलगी झाल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी आलेल्या या बातमीने त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि मराठी मनोरंजन क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. काही चाहत्यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरी मुलगी आल्याच्या योगायोगाचा उल्लेख केला आणि देवीचे स्वागत असल्याचे म्हटले. शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस आज, ११ ऑक्टोबर रोजी आहे. नक्की वाचा: Suraj Chavan Blessed With Baby Girl: सूरज चव्हाण च्या घरी जन्माष्टमी दिवशी 'लक्ष्मी'चं आगमन; झाला लेकीचा बाबा.
सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे झाले आई-बाबा
सुरुची आणि पियुष यांचा प्रवास
सुरुची अडारकर 'का रे दुरावा', 'अंजली' आणि 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' यांसारख्या मालिकांमुळे घराघरांत पोहोचली. पियुष रानडे हे मराठी मालिका आणि चित्रपटांतील ओळखीचे नाव आहे.
दोघांनी 'अंजली' या मालिकेत एकत्र काम केले होते. ६ डिसेंबर २०२३ रोजी त्यांनी विवाह केला. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी सुरुची गर्भवती असल्याच्या चर्चा समाजमाध्यमांवर सुरू होत्या. मात्र, त्यावेळी या जोडप्याने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नव्हती. आता त्यांनी स्वतः मुलगी झाल्याची घोषणा केली आहे.