अभिनेता Swwapnil Joshi सुरू करतोय नवं OTT platform; Narendra Firodia सोबत नव्या क्षेत्रात

Tamora Digiworld Pvt Ltd ही स्वप्नील जोशीची कंपनी Letsflix सोबत येऊन भारताचं नवं ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करेल.

Swwapnil Joshi | PC: Twitter

दीड वर्षांपासून सारं जग कोरोना वायरसमुळे 'लॉकडाऊन'च्या भीतीने बंदिस्त झालं आहे. लहान मोठे उद्योग धंडे बंद पडण्यापासून सिनेक्षेत्राला देखील त्याचा मोठा फटका बसला आहे. अद्याप नाट्यगृह, सिनेमागृह बंद असल्याने अनेकांनी ओटीटी वरच आपले सिनेमे प्रदर्शित केले. त्यामुळे भारतामध्येही आता स्वतःचं ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी (Swwapnil Joshi) आता Narendra Firodia यांच्यासोबत येऊन भारताचं स्वतःचं ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करत आहेत. नुकतीच स्वप्नीलने त्याबाबतची घोषणा सोशल मीडीयावर केली आहे.

कोरोना जागतिक महामारीमुळे ठप्प झालेलं जग बघून एक अभिनेता म्हणून मी स्वतःला आता पुढे काय? असा प्रश्न विचारला. त्याचं उत्तर एका वर्षाने मिळाल्याचं त्याने सांगितलं आहे. स्वप्नीलच्या पोस्ट मध्ये त्याने दिलेल्या माहितीनुसार, Tamora Digiworld Pvt Ltd ही त्याची कंपनी Letsflix सोबत येऊन भारताचं नवं ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करेल. Letsflix ची घोषणा Narendra Firodia यांनी केली होती. त्यामध्ये भारतीय प्रादेशिक भाषेमधील कलाकृती पहायला मिळणार आहेत. त्यांच्या जोडीने आता स्वप्नील जोशी देखील या क्षेत्रात उतरणार आहे. New Guidelines for Social Media, OTT Platform: सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी लवकरच नवी नियमावली- केंद्र सरकार.

स्वप्निल जोशी पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

अद्याप या ओटीटी प्लॅटफॉर्मचं नाव, ते कधी, कसं लॉन्च होईल याची माहिती मिळालेली नाही पण स्वप्नीलने त्याच्या पोस्ट मध्ये लवकरच आणि रसिकांच्या अपेक्षांच्या आधीच लॉन्च केले जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

मराठी मध्ये काही दिवसांपूर्वीच प्लॅनेट मराठी हे एक ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आले आहे. 'जून' हा त्यावर प्रदर्शित झालेला पहिला सिनेमा आहे.