Amazon चे मालक Jeff Bezos यांना शाहरूख खान  ने शिकवला 'डॉन' चा सुपरहिट डायलॉग (Watch Video)
शाहरुख खान (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानच्या (Shah Rukh Khan) डायलॉगची भूरळ सार्‍या जगावर पसरली आहे. सध्या भारत दौर्‍यावर असलेल्या अमेझॉन चे सीईओ (Amazon CEO) जेफ बेजोस Jeff Bezos यांच्यासाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बॉलिवूड कलाकारांसोबत आयोजित मीट अ‍ॅन्ड ग्रीट कार्यक्रम Jeff Bezos यांनी देखील एन्जॉय केला. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यानेदेखील या इव्हेंटमधील एक व्हिडिओ अपलोड केला आहे.

शाहरूख खानने 'डॉन' सिनेमातील 'डॉन को पकडना मुश्लिक ही नही नाममुक्नीन है' हा त्याचा फेमस डायलॉग Jeff Bezos कडून वदवून घेतला आहे. जेफ यांना हिंदी भाषेतील हा डायलॉग शिकवताना शाहरूख खाननेही संयम दाखवला आहे. तर जेफ यांच्यासाठी त्याने डायलॉगमध्ये थोडा बदलही केला. 'बॉब बिस्वास' चित्रपटात शाहरूख खान आणि अभिषेक बच्चन एकत्र झळकणार!

रितेश देशमुखचं ट्वीट

शाहरूख खानचं ट्वीट

शाहरूख खानने देखील जोया अख्तर आणि जेफ बेजोस यांच्यासोबत खास फोटो शेअर केला आहे. या कार्यक्रमामध्ये बॉलिवूडचे अनेक बडे सेलिब्रिटी उपस्थित होते. भूमि पेडणेकर, आर. माधवन, पंकज त्रिपाठी, अली फजल, ऋचा चड्ढा, कमल हासन, राजकुमार राव, फरहान अख्तर, शिबानी दांडेकर उपस्थित होते.