हरियाणा सुपरस्टार सपना चौधरी हिला 'कलंक' चित्रपटातील 'या' कलाकारासोबत काम करण्याची इच्छा
परंतु आता सपना हिने 'कलंक' (Kalank) चित्रपटातील या कलाकारासोबत काम करण्याची इच्छा वर्तवली आहे.
हरियाणा मधील सुपर डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary)ही सध्या जोरदार प्रेक्षकांच्या चर्चेत आहे. तसेच गेल्या महिन्यात बॉलिवूड चित्रपट 'दोस्ती के साइड इफेक्टस' (Dosti Ke Side Effects) मधून सपना हिने महिला पोलिसाची भुमिका साकारली होती. मात्र दिवसेंदिवस सपना हिचे फॅनफॉलोअर्स वाढत चालल्याने ती सुद्धा खुप खुश दिसून येत आहे. परंतु आता सपना हिने 'कलंक' (Kalank) चित्रपटातील या कलाकारासोबत काम करण्याची इच्छा वर्तवली आहे.
हरियाणवी आणि भोजपूरी गाण्यांवर थिरकणारी सपना सगळ्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मात्र आता तिला बॉलिवूडमध्ये काम करण्याचे वेध लागले असून 'कलंक' चित्रपटामधील मधील अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) ह्याच्या सोबत काम करायची इच्छा असल्याचे म्हटले आहे.(हेही वाचा-सपना चौधरी हिने मित्रासोबतच्या नात्याला दिले प्रेमाचे नाव, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल)
काही दिवसांपूर्वी सपना चौधरी हिने अमारवती येथे बावली परेडच्या शूटिंगदरम्यान याबद्दल खुलासा केला आहे. तर संजय दत्त हा करण जोहरचा आगामी चित्रपट कलंक मधून झळकणार आहे. या चित्रपटातील संजय दत्त ह्याचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला आहे.