Rohit Raut आणि Juilee Joglekar 23 जानेवारीला अडकणार लग्नबंधनात; लग्नाचं काऊंटडाऊन देत शेअर केले खास क्षण
अनेक सिंगिंग शो मध्ये ते एकत्र दिसले आहेत.
सा रे ग म लिटिल चॅम्प्स मध्ये 12 वर्षांपूर्वी एकत्र स्पर्धक म्हणून भेटलेले रोहित राऊत (Rohit Raut) आणि जुईली जोगळेकर (Juilee Joglekar) आता त्यांचं नातं एक पाऊल पुढे घेऊन जाणार आहेत. येत्या 23 नोव्हेंबरला रोहित आणि जुईली लग्नबंधनात अडकणार आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांच्या आयुष्यातील या स्पेशल दिवसाची तारीख त्यांनी खास अंदाजात शेअर केली आहे.
रोहित आणि जुईली यांनी लग्नाच्या तारखेचा काऊंट डाऊन सुरू करत प्रत्येक दिवशी एक मेमरी शेअर केली आहे. नागपूरचा रोहित राऊत आणि पुण्याची जुईली जोगळेकर मुळशी मध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या त्यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे.
रोहित आणि जुईलीने एकमेकांवरील प्रेम व्यक्त केल्याचा दिवस
रिलेशनशीप मध्ये आल्यानंतर एकत्र परफॉर्ममन्स
दरम्यान रोहित आणि जुईली मागील 8 वर्ष रिलेशनशीप मध्ये आहेत. आता ते त्यांचं नातं पुढल्या टप्प्यावर घेऊन जाणार आहेत. दरम्यान टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना रोहितने 21 जानेवारीला दोघेही मुळशी येथील डेस्टिनेशन वेडिंगच्या ठिकाणी भेटणार असल्याचं म्हणाला आहे. त्यांचा मुळशी मधील विवाह मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. हे देखील नक्की वाचा: Virajas Kulkarni आणि Shivani Rangole यांचं नातं झालं Official! पहिल्यांदाच सोशल मीडीयात 'खास फोटो' शेअर करत दिली कबुली.
काही दिवसांपूर्वी रोहित आणि जुईली यांच्यासाठी त्यांच्या मित्रमंडळींनी केळवण ठेवल्याचेही फोटो त्यांनी शेअर केल्यानंतर लवकरच लगीनघाई सुरू होणार असल्याची कुणकुण त्यांच्या चाहत्यांना लागली होती.