PVR INOX Passport:आता PVR INOX मध्ये पहा 699 रूपयांमध्ये 10 सिनेमे; जाणून घ्या काय आहे हा Monthly Subscription Pass

हे अॅप किंवा वेबसाइटद्वारे खरेदी केले जाऊ शकते.

(Photo Credit - Facebook)

प्रेक्षकांना पुन्हा प्रेक्षागृहाकडे खेचण्यासाठी PVR INOX Limited कडून 'PVR INOX Passport'लॉन्च करण्यात आला आहे. हा एक सब्सक्रिप्शन पास असणार आहे. या द्वारा प्रेक्षकांना महिन्याच्या फी मध्ये 10 सिनेमे पाहता येणार आहे. 16 ऑक्टोबर पासून या monthly subscription pass सुरू होणार असून त्याची किंमत 699 रूपये असणार आहे.

subscription pass हा सोमवार ते गुरूवार दरम्यान चालणार आहे. तसेच यामधून पीव्हीआरच्या प्रिमियम सर्व्हिसेस जसे की IMAX, Gold, LUXE आणि Director's Cut यांना दूर ठेवण्यात आलं आहे. सिनेमाचं यश हे बॉक्स ऑफिसवरील त्याच्या कामगिरीवर देखील अवलंबून असतं. त्यामुळे प्रेक्षक सिनेमे पाहण्यासाठी थिएटर मध्ये येणं आवश्यक आहे.

कंपनीने अलीकडेच खाद्यपदार्थ आणि पेयांच्या किमती 40 टक्क्यांनी कमी केल्या आहेत याने सोमवार ते गुरुवार सकाळी ९ ते संध्याकाळी ६ दरम्यान वाजवी किमतीचे फूड कॉम्बो ₹९९ ला प्रेक्षकांना मिळत आहे.

PVR INOX पासपोर्ट' किमान तीन महिन्यांच्या सबस्क्रिप्शन कालावधीसह खरेदी केला जाऊ शकतो. हे अॅप किंवा वेबसाइटद्वारे खरेदी केले जाऊ शकते. PVR-INOX Merger: पीव्हीआर आणि आयनॉक्स ने केली विलीनीकरणाची घोषणा, PVR INOX असे असेल सिनेमागृहांचे नाव .

"रिडीम करण्यासाठी, युजर्सना चेक आउटच्या वेळी पेमेंट पर्याय म्हणून पासपोर्ट कूपन निवडावे लागेल. एकापेक्षा अधिक तिकिटांसाठी व्यवहार झाल्यास, एक तिकीट पासपोर्ट कूपन वापरून रिडीम केले जाऊ शकते आणि उर्वरित पैसे दिले जाऊ शकतात, पेमेंटच्या इतर कोणत्याही नियमित पद्धतीद्वारे वापरल्या जाऊ शकतात.

ज्यांना 'पासपोर्ट' वापरून चित्रपट बघायचा आहे त्यांना सरकारने जारी केलेली ओळखपत्रं या पासपोर्ट सोबत दाखवावी लागतील. हा पासपोर्ट नॉन ट्रान्सफरेबल असेल.