Priyanka Nick Wedding: PETA ने लावले प्रियांका निकवर लग्नामध्ये प्राण्यांचा गैरवापर केल्याचा आरोप, का ते वाचा

या दोघांनी ख्रिस्ती आणि हिंदू परंपरेनुसार दोन वेळा लग्नबंधनात अडकले गेले.तर रिसेप्शन पार्टीसाठी हे दोघे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. तर 4 डिसेंबरला या शाहीलग्नाची रिसेप्शन पार्टी होणार आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) यांचा लग्नसोहळा रविवार 2 डिसेंबरला संपन्न झाला. या दोघांनी ख्रिस्ती आणि हिंदू परंपरेनुसार दोन वेळा लग्नबंधनात अडकले गेले.तर रिसेप्शन पार्टीसाठी हे दोघे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. तर 4 डिसेंबरला या शाहीलग्नाची रिसेप्शन पार्टी होणार आहे. मात्र या दोघांच्या लग्नाबद्दल वाद निर्माण झाला आहे. PETA या कंपनीने प्रियांका आणि निक यांच्या विरुद्ध प्रण्यांचा लग्नात गैर वापर केल्याचा आरोप केला आहे. तर लग्नामध्ये हत्ती आणि घोड्यांचा वापर करण्यात आला होता.

PETA ने त्यांच्या ट्विटरवरुन सोमवारी याबद्दल एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, 'प्रिय प्रियांका चोप्रा आणि निक जोनस, लोकांनी आता लग्नामध्ये हत्ती आणि घोड्यांचा वापर करणे बंद केले आहे. लग्नासाठी शुभेच्छा परंतु आम्हाला या गोष्टीमुळे खंत वाटते आहे. मात्र प्राण्यांसाठी हा चांगला दिवस नव्हता.'(हेही वाचा -Priyanka Nick Wedding: Sangeet Ceremony मध्ये Priyanka - Nick परिवारामध्ये रंगली नृत्याची चुरस)

प्रियांका चोप्रा आणि निकला त्यांच्या लग्नावरुन नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले होते. त्यावेळी लग्नामध्ये खूप आतिशबाजी करण्यात आली होती. परंतु दिवाळीच्या वेळी खुद्द प्रियांकाने फटाके उडविण्याच्या बाबतीत संदेश दिला होता. तर प्रियांकाने तिच्या लग्नात खूप आतिशबाजी केल्याने लोकांना ते आवडले नाही.