Oppenheimer Movie Controversy: आक्षेपार्ह दृश्यामुळे ओपनहायमर चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या

ओपेनहायमर चित्रपट वादाच्या जाळ्यात अडकला आहे.

Oppenheimer Controversy Photo Credit Twitter

Oppenheimer Movie Controversy: हॉलिवूड चित्रपट काल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाची कथा जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटातील एका सीनमुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नेटकऱ्यांनी ओपेनहाइमर या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत भारतीय सेसॉर बोर्डावर प्रश्न उपस्थित केला आहे. हा चित्रपट पहिल्यांदा पहिल्यावर कळत नाही असं म्हटलं जातं हा चित्रपट फार गुंतागुतीचा आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

नेटकऱ्यांनी पोस्ट शेअर करत म्हणाला आहे की, मी ओपेनहाइमर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत आहे. मला नुकतेच कळले की त्यात भगवद्गीतेचा समावेश असलेले एक अत्यंत आक्षेपार्ह दृश्य आहे. मी येथे त्याची पुनरावृत्ती करणार नाही, परंतु त्यात काहीतरी स्पष्ट आहे. हिंदू धर्माचे सकारात्मक आणि अचूक चित्रण करण्यासाठी हॉलीवूड आणि वेस्टन कल्चरवर कधीही विश्वास ठेवू नका.

एक यूजर्सने या चित्रपटात भगवत गीतेचे अपमान केल्यामुळे हिंदू धर्मिय लोकांच्या भावना दुखावल्याचे सांगितले आहे. चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ ज्यांना अणूबॉम्बचे जनक म्हणूनही ओळखलं जातं अशा ज्युलियस रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून नोलनने अक्षरशः दुसऱ्या महायुद्धापासून ते भविष्यात मानवतेला निर्माण होणारे धोके यावर भाष्य केलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif