Rahat Indori Tests Positive For Covid-19: प्रसिद्ध गझलकार राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण

इश्क, मिशन काश्मीर, मुन्नाभाई एमबीबीएस, मर्डर अशा अनेक चित्रपटांची गाणी राहत इंदौरी यांनी लिहिली आहेत.

Rahat Indori (Photo Credit: Twitter)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग देशभरात अद्यापही झपाट्याने वाढताना दिसत आहे. दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांपासून अगदी व्हीव्हीआयपीपर्यंत सर्वचजण कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. यातच प्रसिद्ध गझलकार आणि शायर राहत इंदौरी यांना (Rahat Indori) कोरोनाची लागण झाली आहे राहत इंदौरी यांचे पुत्र सतलज यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर स्वत: इंदौरी यांनीही याबाबत ट्वीट केले आहे. मध्य प्रदेशातील इंदौर येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे समजत आहे. राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झाल्याची समजताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंताजनक वातावर निर्माण झाले आहे.

“कोविडची सुरुवातीची लक्षणे आढळून आल्याने मी काल तपासणी करून घेतली, ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अरविंदो रुग्णालयात मी उपचार घेत आहे. प्रार्थना करा की लवकरात लवकर मला या आजाराला हरवता येईल. आणखी एक विनंती आहे, कृपया कोणीही मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करू नये, माझ्या प्रकृतीबाबतची माहिती आपल्याला ट्विटर व फेसबुकद्वारे मिळत राहील.” अशा अशायाचे ट्वीट राहत इंदौरी यांनी केले आहे. हे देखील वाचा- Sanjay Dutt Gets Discharged: अभिनेता संजय दत्त याला मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमधून सुट्टी

राहत इंदौरी यांचे ट्विट-

राहत इंदौरी हे प्रसिद्ध शायर तर आहेतच, याशिवाय त्यांनी बॉलिवूडसाठीही अनेक गाणी लिहिली आहेत. इश्क, मिशन काश्मीर, मुन्नाभाई एमबीबीएस, मर्डर अशा अनेक चित्रपटांची गाणी राहत इंदौरी यांनी लिहिली आहेत. आज हमने दिल का हर किस्सा (सर), चोरी चोरी जब नजरे मिली (करीब), ये रिश्ता क्या कहलता है (मीनाक्षी), धुआ धुआ (मिशन काश्मीर), दिल को हजार बार (मर्डर) अशी अनेक अर्थपूर्ण गाणी त्यांच्या लेखणीतून उतरली आहेत. ऋत, मौजूद, नाराज अशा पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे.