बिग बॉसनंतर Nikki Tamboli आणि Arbaz Patel ची मनाली ट्रिप; दोघांनी सोशल मिडीयावर शेअर केले फोटो
निक्की तांबोळी आणि अरबाझ पटेल दोघे हिमाचल प्रदेशमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. दोघांनीही सोशल मीडियावर वॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत.
Nikki Tamboli and Arbaz Patel Manali Trip: बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन जोरात गाजला आहे. या सिझनमध्ये निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाझ पटेल (Arbaz Patel) यांची हॉट कॅमेस्ट्री चर्चेत राहिली. 'बिग बॉस मराठी 5' संपल्यानंतरही दोघांनी आपलं नात जपलं आहे. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर दोघांचे अनेक व्हिडीओ एकत्र पहायला मिळाले. सध्या दोघे हिमाचल प्रदेशमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. निक्की आणि अरबाज दोघांनीही सोशल मीडियावर वॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. दोघांचे नाते अजूनच खुलताना पहायला मिळत आहे. (Nikki Tamboli Arbaz Patel Romantic Video: बिग बॉसनंतरही प्रेम बहरले! निक्की तांबोळीचं अरबाज पटेलबरोबर रोमँटिक व्हिडिओ शुट)
त्याशिवाय दोघांनी शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोंमध्ये दोघए गाडीतून फिरताना दिसत आहेत. ज्यात अरबाझ हा निक्कीला पाहताना दिसत आहे. तर निक्की दुसरीकडे पाहत आहे. निक्कीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये मनाली, हिमाचल प्रदेश असं लोकेशन स्टोरीत लिहिल आहे. ज्यात रूम हिटर देखील पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरातून अरबाज बहेर पडल्यानंतर दोघांमध्ये मोठा दुरावा निर्माण झाला आहे. निक्कीच्या आईने बिगबॉसच्या घरात येऊन निक्कीला अरबाजच्या साखरपूड्याविषयी सांगितले होते. बिग बॉस संपल्यानंतर निक्की आणि अरबाज कही दिवसांनू पून्हा एकत्र दिसले. त्यानंतर आत दोघे एकत्र फिरत आहेत.
अरबाज याने निक्कीच्या आधी लिझा ब्रिंदा हिला डेट केलं होतं.दोघांचा साखरपूडा झाल्याच्याही चर्चा होत्या. पण, निक्कीच्या प्रेमात पडल्यावर अरबाजने लिझा ब्रिंदासोबतच त्याचं नातं संपवलं. तर, अरबाजच्या आधी निक्की तांबोळीचं नाव बिझनेसमन मनन शाहबरोबर जोडण्यात आलं होतं. दोघे एकमेकांचे फोटो शेअर करायचे. तिने दोघांच्या नात्याची कबुली देखील दिली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)