25 ते 27 जानेवारी दरम्यान शिवसैनिक चाहत्यांना देणार मोफत 'ठाकरे' पाहण्याची संधी, पहा कधी, कुठे कसा?
रत्नागिरीमध्ये राधाकृष्ण सिटी प्राईड या सिनेमागृहात दुपारी 12-3 आणि रात्री 9-12 अशा दोन वेळांमध्ये मोफत स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं आहे.
Thackeray Marathi Movie: बाळासाहेब ठाकरे (Bal Keshav Thackeray) यांच्या आयुष्यावर आधारित बहुप्रतिक्षित सिनेमा 'ठाकरे'(Thackeray) 25 जानेवारी दिवशी महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बाळासाहेबांवर प्रेम करणार्या चाहत्यावर्गामध्ये या सिनेमाबबात उत्सुकता आहे. मुंबई शिवसैनिकांनी एकीकडे फर्स्ट डे फर्स्ट शो पहाटे 4 वाजता आयोजित केला आहे तर रत्नागिरीमध्ये चक्क तीन दिवस या सिनेमाचे मोफत शो आयोजित केले आहेत. ठाकरे सिनेमाचा 'फर्स्ट डे फर्स्ट शो' पहाटे 4 वाजता, महाराष्ट्रात भारतीय सिनेमाच्या इतिहासातील पहिलीच घटना
रत्नागिरीमधील राधाकृष्ण सिटी प्राईड सिनेमागृहामध्ये शिवसैनिकांनी 'ठाकरे' सिनेमा मोफत पाहण्यासाठी उपलब्ध केला आहे. सहा वेळा शिवसैनिकांनी हा सिनेमा चाहत्यांना मोफत उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली आहे. रत्नागिरीचे प्रभारी नगाराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये याबबतची माहिती दिली आहे. 'ठाकरे' सिनेमामधून सचिन खेडेकरचा आवाज गायब, तुम्ही ऐकली का 'Thackeray' ची नवी झलक
कधी आणि कुठे असेल 'ठाकरे' सिनेमाचा मोफत शो?
25 ते 27 जानेवारी 2019 या तीन दिवसांमध्ये 'ठाकरे' सिनेमाचा मोफत शो आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये राधाकृष्ण सिटी प्राईड या सिनेमागृहात दुपारी 12-3 आणि रात्री 9-12 अशा दोन वेळांमध्ये मोफत स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं आहे. 27 जानेवारी दिवशी होणारा शो शाळकरी आणि कॉलेजच्या मुलांसाठी असेल. याकरिता प्रथम येणार्यांना प्राधान्य असा नियम लावून चाहत्यांना 'ठाकरे' सिनेमाचा मोफत शो पाहता येणार आहे.
'ठाकरे' सिनेमा हा बाळासाहेबांच्या आयुष्यावर आधारित आहे. अभिजीत पानसे यांनी या सिनेमाचं दिगदर्शन केलं असून संजय राऊत यांनी निर्मिती केली आहे. बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन या सिनेमात बाळासाहेबांची प्रमुख भूमिका साकारत आहे.