BIgg Boss Marathi Season 2 Winner शिव ठाकरेच्या गाडीचा अपघात, शिव आणि त्याचा परिवार अपघातातुन सुखरुप

सुदैवाने, तो आणि त्याचे कुटुंब ठीक आहेत. या अपघतात त्याच्या चेहऱ्याला गंभीर मार दुखापत झाली आहे.

Shiv Thakrey (Photo Credit - Instagram)

अभिनेता आणि बिग बॉस (Bigg Boss Marathi) मराठीचा माजी विजेता शिव ठाकरे (Shiv Thakare) त्याच्या कुटुंबासह प्रवास करत असताना अमरावती (Amravati) जिल्ह्यातील वाळगावजवळ कार अपघातात थोडक्यात बचावला आहे. सुदैवाने, तो आणि त्याचे कुटुंब ठीक आहेत. या अपघतात त्याच्या चेहऱ्याला गंभीर मार दुखापत झाली आहे. शिवला डोळ्याजवळ टाके पडले आहे. शिव सांगतो, माझी बहीण मनीषा, जिजू सूरज, भाची मनस्वी, आमचे शेजारी माँटी आणि मी सिद्धिविनायक मंदिरातून परतत असताना हा अपघात झाला. आमच्या गाडीला एका टेम्पोने धडक दिली. सुदैवाने, मी स्टेअरिंग सोडले नाही आणि गाडी लगतच्या शेतात गेली. देवाच्या कृपेने आम्ही सर्व सुरक्षित आहोत आणि कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. माझ्या बहिणीच्या डोक्याला जखम झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by मराठी कलाकार विश्व (@marathi_kalakar_vishva_)

 

शिवच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. शिवच्या अपघातानंतर त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी मन उडू उडू झाला या मराठी शोमध्ये दिसणारा अजिंक्य राऊतही एका भीषण कार अपघातातून बचावला होता. तोही आपल्या गावाजवळून जात होता. (हे ही वाचा Hruta Durgule दिग्दर्शक Prateek Shah सोबत रिलेशनशीप मध्ये; क्युट फोटो पोस्ट करत दिली 'ही' कबुली.)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

मराठी कलाविश्वातलं एक नावाजलेलं नाव म्हणजे शिव ठाकरे. शिव मूळचा अमरावतीचा आहे. त्याचा जन्म 9 सप्टेंबर 1989 मध्ये अमरावती येथे झाला आहे. रोडीजमधील त्याच्या प्रभावी कार्यानंतर, त्याने बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन जिंकला. त्याच्या हातात काही चित्रपट आहेत. मात्र, त्याच्या आगामी सर्व प्रकल्पांबाबत तो अजुन गप्प आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधणारा शिव अनेकदा त्याचे नवनवीन फोटो, व्हिडिओ शेअर करत असतो.