आंबेडकर जयंती 2019 निमित्त महामानवाला अभिवादन करत नागराज मंजुळे यांनी शेअर केला खास सेल्फी (Photo)

बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महामानवाला अभिवादन केले आहे.

Nagraj Manjule (Photo Credits: Facebook)

लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी फेसबुकवर एक खास सेल्फी शेअर करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) महामानवाला अभिवादन केले आहे. प्रसिद्ध भीम गायिका कडूबाई थोरात (Kadubai Thorat) यांच्या सोबतचा फोटो शेअर करत एक छानसा संदेशही नागराज यांनी लिहिला आहे. (नवीन पिढीपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहचण्यासाठी मुलांसोबत शेअर करा 'या' खास गोष्टी!)

"मायबापाहून भिमाचे उपकार लय हाय रं, आपुन खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबाची सही हाय रं..." असं लिहितं हा सेल्फी नागराज यांनी शेअर केला.

नागराज मंजुळे फेसबुक पोस्ट:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 जयंतीनिमित्त अनेक दिग्गजांनी महानावाला अभिवादन केले आहे. त्यात आता नागराज मंजुळेंचीही भर पडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सांगितिक आदरांजली देणारी खास भीमगीतं

कडूबाई थोरात या दलित गायिका असून त्यांची अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. त्यांची अनेक गाणी सोशल मीडियावर हिट झाली असून त्यांच्या भीमगीतांना अनेक स्तरातून चांगलीच पसंती मिळत आहे.