Tuzi Athavan Song: मृण्मयी देशपांडे - सिद्धार्थ चांदेकरच्या आगामी Miss U Mister सिनेमामधील पहिलं गाणं रसिकांच्या भेटीला

समीर जोशी दिग्दर्शित Miss U Mister या सिनेमामध्ये मृणमयी देशपांडे, सिद्धार्थ चांदेकर सह सविता प्रभुणे, राजन भिसे हे कलाकार दिसणार आहेत.

Miss U Mister (Photo Credits: You Tube)

Miss U Mister Song Tuzi Athavan : अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) आणि सिद्धार्थ चांदेकर (Siddarth Chandekar)लवकरच मिस यू मिस्टर हा सिनेमा 28 जूनला रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील पहिलं गाणं 'तुझी आठवण' हे गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. लॉंग डिस्टंटमध्ये राहणार्‍या एका तरूण जोडप्याची कहाणी या सिनेमाची पटकथा आहे. तुझी आठवण गाण्यात मृण्मयी आणि सिद्धार्थच्या केमेस्ट्री पुन्हा बघायला मिळणार आहे. पहा सिनेमाचं पहिलं पोस्टर 

'तुझी आठवण' गाण्याची झलक 

लंडन आणि भारतामध्ये राहणार्‍या तरूण जोडप्याचं आयुष्य कसं असेल त्याची या गाण्यामध्ये झलक पहायला मिळाली आहे. आनंदी जोशी आणि आलाप देसाई याच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे. वैभव जोशी या गाण्याचा गीतकार आहे तर आलाप देसाई यानेच या गाण्याला संगीत दिले आहे.

समीर जोशी दिग्दर्शित Miss U Mister या सिनेमामध्ये मृणमयी देशपांडे, सिद्धार्थ चांदेकर सह सविता प्रभुणे, राजन भिसे हे कलाकार दिसणार आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif