Tushar Ghadigaonkar Dies by Suicide: मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरने उचलले कठोर पाऊल; काम मिळत नसल्याने केली आत्महत्या
तुषार घाडीगावकर हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील रहिवासी होता. तुषार रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात सक्रिय होता. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्याने नाट्य, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनयाचा प्रवास सुरू केला.
Tushar Ghadigaonkar Dies by Suicide: मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनयाद्वारे प्रसिद्धी मिळवणारे तुषार घाडीगावकर (Tushar Ghadigaonkar) यांनी शुक्रवारी आत्महत्या (Suicide) केली. काम मिळत नसल्यामुळे अभिनेत्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या अचानक निधनाने त्यांच्या कुटुंबासह, मित्रमंडळी आणि चाहत्यांसह मराठी मनोरंजन उद्योगाला मोठा धक्का बसला आहे.
तुषार घाडीगावकर हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील रहिवासी होता. तुषार रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात सक्रिय होता. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्याने नाट्य, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनयाचा प्रवास सुरू केला. परंतु अभिनेत्याने उचललेल्या कठोर पाऊलामुळे त्यांचा अभिनय प्रवास थांबला आहे. सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात कामाच्या अपुऱ्या संधी आणि मानसिक दबावामुळे तुषारने हा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. (हेही वाचा - Vivek Lagoo Dies: अभिनेते विवेक लागू यांचे निधन; आज अंत्यसंस्कार)
चित्रपट कलाकारांच्या प्रतिक्रिया
View this post on Instagram
दरम्यान, 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता अंकुर वाढवे यांनी तुषारला भावनिक श्रद्धांजली वाहिली आहे. अंकुर वाढवे यांनी म्हटलं आहे, 'का मित्रा? कशासाठी? काम येते आणि जाते! आपल्याला मार्ग शोधावा लागतो, पण आत्महत्या हा मार्ग नाही! तुषार, जर तू हरलास तर आम्ही सगळे हरलो...' (हेही वाचा, Beed Father Commits Suicide Outside Bank Gate: बँकेत अडकले पैसे, लेकीचं लग्न अडलं; बापाचा बँकेच्या गेटवरच गळफास, बीड येथील घटना)
याशिवाय, मुग्धा गोडबोले, समीर पाटील आणि अभिषेक देशमुख यासारख्या अनेक कलाकारांनीही तुषारच्या मृत्यूवर सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. तुषारने लवंगी मिर्ची, मन कस्तुरी रे, भाहुबली, उनाड, झोम्बेली, हे मन बावरे यासारख्या अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले होते. याशिवाय, तो अलीकडेच सन मराठीवरील 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत दिसला होता.
आत्महत्या प्रतिबध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक:
टेली मानस (आरोग्य मंत्रालय): 14416 किंवा 1800 891 4416; निमहंस: + ९१ + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; पीक माइंड: 080-456 87786; वांद्रेवाला फाउंडेशन: – 9999 666 555; अर्पिता आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन: 080-23655557; आयकॉल: 022-25521111 आणि 9152987821 आणि 9152987821; सीओओजे मेंटल हेल्थ फाउंडेशन (सीओओजे): 0832-2252525.
(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 0313 05:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

