Vivek Lagoo Dies: अभिनेते विवेक लागू यांचे निधन; आज अंत्यसंस्कार
विवेक आणि रीमा लागू यांनी घटस्फोटानंतर दुसरं लग्न केले नाही. त्यांची लेक मृण्मयी देखील कलाक्षेत्रामध्ये लेखक, अभिनेत्री म्हणून काम करते. बॉलिवूडचा 'थप्पड' सिनेमा तिने सह लेखक म्हणून लिहला आहे.
अभिनेते विवेक लागू (Vivek Lagoo) यांचे 19 जूनच्या रात्री निधन झाले आहे. आज मुंबई मध्ये ओशिवरा येथील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. मराठी मालिका, सिनेमे आणि रंगभूमी वर वावरणारा शिस्तप्रिय नट अशी त्यांची ओळख होती. विवेक लागू हे रीमा लागू यांचे पती होते. मात्र रीमा लागू- विवेक लागू यांचा घटस्फोट झाला होता. रीमा लागू यांच्या निधनानंतर 9 वर्षांनी आता विवेक लागूंनीही जगाचा निरोप घेतला. विवेक लागू यांच्या पश्चात त्यांची एकुलती एक लेक मृण्मयी लागू वायकूळ आहे.
विवेक लागू हे पुण्याचे आहेत. लेखन, दिग्दर्शनाची आवड असणार्या विवेक लागू यांनी अभिनयातही आपलं नशीब आजमवलं. विवेक लागू हे चार दिवस सासूचे मालिकेत झळकले होते. विजया मेहता यांच्या शिबिरातून त्यांचा अभिनेता म्हणून प्रवास सुरू झाला. त्यांनी शेक्सपियरची दोन नाटकंही केली. 'अगली', 'व्हॉट अबाऊट सावरकर', 'सर्व मंगल सावधान' या सिनेमांमध्ये ते होते. दरम्यान विवेक लागू हे अभिनयासोबतच बॅंकेमध्येही काम करत होते. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ कलाक्षेत्राला दिला. विवेक आणि रीमा लागू यांची लव्ह स्टोरी बॅकेमधील नोकरीच्या दिवसांमधील आहे.
मृण्मयी लागू ची वडीलांसाठी भावूक पोस्ट
View this post on Instagram
विवेक आणि रीमा लागू यांनी घटस्फोटानंतर दुसरं लग्न केले नाही. त्यांची लेक मृण्मयी देखील कलाक्षेत्रामध्ये लेखक, अभिनेत्री म्हणून काम करते. बॉलिवूडचा 'थप्पड' सिनेमा तिने सह लेखक म्हणून लिहला आहे. विवेक लागूंच्या निधनानंतर मृण्मयीने त्यांचा एक फोटो शेअर करत वडीलांसाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2025 08:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

