बाळासाहेबांसाठी कायपण, अभिनेता प्रविण तरडेंनी कापली मिशी

त्यांना ज्यांनी ज्यांनी आजवर पाहिले आहे त्यांना ते अशाच स्टाईलमध्ये दिसले आहेत. मात्र, बाळासाहेबांच्या जिवनापटात भुमिका साकारताना तरडे यांनी व्यक्तिरेखेची गरज म्हणून मिशी काढली आहे.

Actor Pravin Tarade Share Thackeray Movie Memories | (Photo courtesy: archived, edited images)

'ठाकरे' (Thackeray Movie ) हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला आणि बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्वाचे जनमानसावरील गारुड पुन्हा एकदा पहायला मिळाले. 'ठाकरे' चित्रपटातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याने बाळासाहेबांची भूमिका साकारली आहे. दरम्यान, हा चित्रपट ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू उलघडून दाखवत असला तरी, चित्रपटात त्यांच्यासोबत असलेल्या अनेक व्यक्तिरेखांचाही समावेश आहे. कामगार नेते दत्ता साळवी यांचीही व्यक्तिरेखा त्यापैकीच एक. चित्रपटात दत्ता साळवी (Dattaji Salvi ) यांची व्यक्तिरेखा अभिनेते प्रविण तरडे (Pravin Tarade) यांनी साकारली आहे. तरडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून बाळासाहेब आणि ठाकरे चित्रपटाबाबत आठवणी शेअर केल्या आहेत. (हेही वाचा-Thackeray Movie Review: धारधार संवाद, लाजवाब अभिनय आणि राजकारणाच्या पटाबाहेरील अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी 'ठाकरे' पाहाच!)

'ठाकरे' हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात मराठीतील सुमारे 11 अभिनेत्यांचा समावेश आहे. या चित्रपटात दत्ताजी साळवी या कामगार नेत्याची व्यक्तिरेखा साकारताना आलेल्या अनुभवाबद्दल एक आठवण प्रविण तरडे यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. तरडे यांनी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यासोबत असेला एक बिनमिशीतील फोटो शेअर केला आहे. महत्त्वाचे असे की, ओठांवरील दाठ आणि विशिष्ट पद्धतीत असलेली झुपकेदार मिशी आणि डोक्यांवरील कुरळे केस ही तरडे यांची ओळख. त्यांना ज्यांनी ज्यांनी आजवर पाहिले आहे त्यांना ते अशाच स्टाईलमध्ये दिसले आहेत. मात्र, बाळासाहेबांच्या जिवनापटात भुमिका साकारताना तरडे यांनी व्यक्तिरेखेची गरज म्हणून मिशी काढली आहे.

मिशी नसलेला लूक असलेला फोटो फेसबुकवर शेअर करत 'ठाकरे .. कामगार नेते दत्ता साळवी .. पहिल्यांदाच मिशी कापली होती फक्त बाळासाहेबां साठी..' असे म्हटले आहे. अभिनेता नवाजुद्दीन याने साखारलेली बाळासाहेबांची व्यक्तिरेखा पाहून त्याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. तर तरडे यांचा अभिनयही तोडीस तोड झाल्याचे सांगत त्यांच्याही अभिनयाचे कौतुक केले जात आहे.