Manasi Naik आणि पती Pradeep Kharera यांचा लग्नानंतरचा रोमान्स दर्शवणारे 'वाटेवरी मोगरा' गाणे प्रदर्शित, Watch Video

हे गाणे सुप्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायले आहे.

Vatewari Mogra Album (Photo Credits: YouTube)

मराठीतील हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) 19 जानेवारीला इंटरनॅशनल बॉक्सर प्रदिप खरेरा (Pradeep Kharera) याच्याशी विवाहबद्ध झाले. तिच्या लग्नसोहळ्याचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर बरोबर 1 महिन्याने तिने आपल्या चाहत्यांना सोशल मिडियाद्वारे गुड न्यूज दिली. ही गुड न्यूज काय हे याची सर्वांनाच उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली होती. मात्र ही गुड न्यूज ती आई होण्याची नसून तिचा आणि प्रदीप खरेरा यांचे नवे गाणे येणार असल्याची होती. या गाण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. हे गाणे 'वाटेवरी मोगरा' (Vatevari Mogra) अखेर आज प्रदर्शित झाले आहे.

वाटेवरी मोगरा या गाण्यामध्ये या नवविवाहित जोडप्यांचा लग्नानंतरचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. हे गाणे सुप्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायले आहे.हेदेखील वाचा- Mansi Naik Wedding: अभिनेत्री मानसी नाईक अडकली विवाहबंधनात; दीपाली सय्यद, रेशम टिपणीस ची लग्नाला उपस्थिती (View Pics)

Watch Video

वाटेवरी मोगरा या म्युजिक अल्बमची निर्मिती सागरिका म्युजिकने केली आहे. या गाण्यामध्ये मानसी आणि तिचा पती प्रदीप खूपच रोमँटिक अंदाजात दिसत आहे. लग्नानंतरचा नवविवाहित जोडप्यांमधील रोमान्स यात दाखविण्यात आला आहे.

मानसीचे ग्रहमाक पूजेपासून ते तिच्या लग्नापर्यंत सर्वच फोटोज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. अनेक प्रसारमाध्यमांनी मानसीचा हा शाही लग्नसोहळा कव्हर केला होता. त्यामुळे तिच्या चाहत्यांना सोशल मिडियाच्या द्वारे हे क्षण अनुभवता आले.

मानसी नाईक ही 'वाट बघतोय रिक्षावाला' आणि 'बाई वाड्यावर या' या दोन तुफान गाजलेल्या गाण्यांमधून घराघरात पोहचली आहे. नोव्हेंबर महिन्यात मानसीचा साखरपुडा पार पडला होता. सोशल मीडियामध्ये तिने या सोहळ्याचे फोटो शेअर करत रसिकांना सुखद धक्का दिला होता.