Mahesh Manjrekar Transformation: अवघ्या 8 महिन्यांत महेश मांजरेकर यांचे पालटले रूप; Fat To Fit प्रवास पाहून चाहते अवाक! (Photos)
अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व बिग बॉसचे मराठीचे होस्ट महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आपल्या विविधांगी लूक्ससाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या काही दिवसांपासून महेश मांजरेकर यांचे अनेक फोटो सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाले आहेत
अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व बिग बॉसचे मराठीचे होस्ट महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आपल्या विविधांगी लूक्ससाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या काही दिवसांपासून महेश मांजरेकर यांचे अनेक फोटो सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाले आहेत, ते पाहून मांजरेकरांच्या वाढलेल्या वजनाबद्दल बरीच चर्चा झाली. मात्र आता महेश मांजरेकर यांनी आपला Tranasformation फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून इंडस्ट्रीमधील लोकांसोबत नेटिझन्सही अवाक् झाले आहेत. 61 वर्षीय महेश मांजरेकर यांची लीन आणि Toned बॉडी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
महेश मांजरेकर यांनी आपल्या इंस्टाग्रामवर आपला आधीचा व आताचा असे दोन फोटो पोस्ट केले आहेत. आपल्या पोस्टमध्ये ते लिहितात, ‘जिथे इच्छा तिथे मार्ग. हे माझ्या 8 महिन्यांच्या प्रयत्नांना फळ आहे. जर का मी हे करू शकतो तर तुम्हीदेखील नक्कीच करू शकाल’. या दोन फोटोंखाली महेश यांच्या मिडियामधील मित्रांसोबतच अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
बिग बॉस फेम रेशम टिपणीस या फोटोखाली लिहिते, ‘तू कॉलेजमध्ये असल्यासारखा तरुण व हँडसम दिसतोय.’ तर ‘घाडगे अँड सून’ फेम सुकन्या मोने यांनी कमेंट केली आहे, ‘मी तुला विचारणारच होते की तू वजन कमी करण्यासाठी काय केले आहेस?’ यावर महेश मांजरेकर यांनी ‘डाएटशिवाय कोणताच पर्याय नाही,' असे उत्तर दिले आहे. दरम्यान महेश मांजरेकर यांचा ‘पांघरूण’ हा चित्रपट येत्या 3 एप्रिलला प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.
(हेही वाचा: कोरोना व्हायरसमुळे जिम बंद; बॉलिवुड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ने शेअर हॉट योगा व्हिडीओ; Watch Video)
महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठीचे दोन सीझन यशस्वीरित्या होस्ट केले असून, आता प्रेक्षक तिसर्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Mar 24, 2020 03:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

