Luckee Movie Review: 'लव्ह' आणि 'लस्ट' मध्ये गोंधळलेल्या तरुणाईची आजची व्यथा!
आजच्या तरुणाईचा, पिअर प्रेशर खाली घेऊन त्यांना घ्याव्या लागणाऱ्या काही निर्णयांचा त्यांच्या आयुष्यावर होणारा परिणाम यावर कॉमेडी अंदाजात भाष्य करण्यात दिग्दर्शक संजय जाधव (Director Sanjay Jadhav) आणि लेखक अरविंद जगताप (Arvind Jagtap) यशस्वी ठरले आहेत.
Luckee Movie Review: संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित 'लकी' (Luckee) या सिनेमाच्या पहिल्या पोस्टर पासूनच या सिनेमाबद्दल रसिकांच्या मनात अनेक प्रश्न होते. सिनेमामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात. अभय महाजन (Abhay Mahajan) आणि दीप्ती सती(Deepti Sati) या फ्रेश जोडीच्या माध्यमातून सिनेमात आजच्या तरुणाईचा, पिअर प्रेशर खाली घेऊन त्यांना घ्याव्या लागणाऱ्या काही निर्णयांचा त्यांच्या आयुष्यावर होणारा परिणाम यावर कॉमेडी अंदाजात भाष्य करण्यात दिग्दर्शक संजय जाधव (Director Sanjay Jadhav) आणि लेखक अरविंद जगताप (Arvind Jagtap) यशस्वी ठरले आहेत.
'लकी' सिनेमा मध्ये अभिनेता अभय महाजन ( लकी) तर दीप्ती सती (जिया) ही भूमिका साकारत आहे. लकी हा सर्वसामान्य घरातला एक 'संस्कारी' मुलगा आहे. तर 'जिया' ही कॉलेजमध्ये हॉट मुलगी आहे. अनेकांप्रमाणे जियावर लकीची नजर असते.पण जिया लकीला काहीच भाव देत नाही. उलट तो तिच्याकडे सारखा पाहतोय हे समजल्यावर ती त्याच्या कानशिलात लगावते. भर कॉलेजमध्ये झालेल्या या प्रकारानंतर जिया आणि लकीच्या फ्रेंड सर्कलमध्ये एक 'प्लॅन' शिजतो. पुढील महिन्याभरात जिया आणि लकी एकमेकांच्या जवळ नाही आले तर लकी त्याच्या मित्रासोबत अंडरवेअरमध्ये भर कॉलेजमध्ये परेड करेल अशी पैज लागते.
लकीचे मित्र जिया आणि लकीला एकत्र आणण्यासाठी खास गोवा ट्रीप प्लॅन करतात. या ट्रीपमध्ये जिया आणि लकी 'सेक्स' करतील यासाठी ते पूर्ण तयारी करतात. मात्र संस्कारी लकी 'कंडोम' शिवाय हा चान्स घेणार नाही असं ठरवतो आणि 'कंडोम' विकत घेण्यासाठी बाहेर पडतो. पण गोव्यात कर्फ्यू असल्याने त्याची वेगळीच फजिती होते. या 'लकी' बॉयच्या आयुष्यात अखेर काय होतं? मनातलं 'प्रेम' की वयात आलेल्या मुलाची 'कामभावना' नेमकं काय जिंकतं हे पाहणं उत्सुकतेचं आहे. Luckee Trailer: अभय महाजन आणि दीप्ती सती यांच्यामधील धम्माल कॉमेडी आणि रोमॅंटिक सिनेमा 'लकी' चा ट्रेलर
कलाकारांचा परफॉर्मन्स कसा?
अभय महाजनने त्याच्या भूमिकेत अगदी सहज अभिनय करताना दिसला. दीप्तीनेही तिच्या भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. चित्रपटाला वेग उत्तम असला तरीही शेवट शार्प आहे. सिनेमाचं बॅकग्राउंड स्कोअर आणि संगीत ही सिनेमासाठी जमेची बाजू आहे. बप्पी लाहिरी आणि वैशाली सामंतच्या आवाजातील 'कोपचा' गाणं, लकी, घे ना घे या गाण्याचा इफेक्ट सिनेमा पाहून बाहेर पडल्यावरही तुमच्यावर राहतो. Luckee Song Majhya Dila Cho:आळंदीच्या चैतन्य देवढेच्या आवाजात 'माझ्या दिलाचो..' कोंकणी गाणं, 'लकी' सिनेमातील नवं गाण
दिगदर्शक संजय जाधव यांनी सिनेमा अचूक बांधताना त्यातील मज्जा टिकवून ठेवली आहे. पण याच प्रयत्नांमध्ये अनेक लहान लहान गोष्टी, कॅरेक्टर्स अधिक प्रभावी होऊ शकली असती. या सिनेमाला आम्ही 2.5 स्टार्स देतो पण अधिक अर्धा आणि हक्काचा स्टार कलाकारांना, थिरकायला लावणाऱ्या संगीताला आहे. त्यामुळे हा थ्री स्टार सिनेमा एकदा पाहायला नक्की हवाच.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)