Ashi Hi Ashiqui: अभिनय बेर्डे याच्या 'आशिकी'चा पत्ता अखेर लागलाच
या चित्रपटासाठी अभिनय 'स्वयम' तर हेमल 'अमरजा' नावाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या व्हॅलेंटाईन डे म्हणजेच १४ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Ashi Hi Ashiqui Teaser: 'ती सध्या काय करतेय' (Ti Saddhya Kay Karte) असं म्हणत मध्येच गायब झालेला अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे (Abhinay Berde) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘अशी ही आशिकी’(Ashi Hi Aashiqui)या चित्रपटांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पहिले टीझर नुकतेच लॉन्च झाले. मुंबई येथील ऑर्किड हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला. अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे या दोघांची रोमॅंटीक लव्हस्टोरी या चित्रपटात पाहायला मिळेल. ‘अशी ही आशिकी’या चित्रपटाच्या माध्यमातून टी-सिरीज पहिल्यांदाच मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे.
टीझरची पहिली झलक पाहून चित्रपटातील लव्हस्टोरी इंटरेस्टिंग असेल असे प्रथमदर्शनी जाणवते. या चित्रपटासाठी अभिनय 'स्वयम' तर हेमल 'अमरजा' नावाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या व्हॅलेंटाईन डे म्हणजेच 1 मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. गुलशन कुमार प्रस्तुत आणि टी-सिरीजचे भूषण कुमार, क्रिशन कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.मुव्हिंग पिक्चर्स, सुश्रिया चित्र,वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे सुध्दा या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. (हेही वाचा, Abhinay Berde Starrer 'Ashi Hi Ashiqui' चा Teaser प्रेक्षकांच्या भेटीला)
सचिन पिळगावकर यांनी ‘अशी ही आशिकी’या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आपल्या वाढदिवशी सचिन यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. तब्बल पाच वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर सचिन पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळत आहेत. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही सचिन यांनीच केले आहे.