Marathi Actors On Kangana Ranaut: मुंबईबाबत कंगना रनौतने केलेल्या 'त्या' वक्तव्यानंतर मराठी कलाकार संतप्त; रितेश देशमुख, स्वप्नील जोशी, स्वरा भास्कर, केदार शिंदे यांचे रोखठोक प्रत्युत्तर

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर अधिक सक्रीय झाली आहे.

Ritesh Deshmukh, Swapnil Joshi, Swara Bhaskar (Photo Credit: Instagram/ Facebook)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर अधिक सक्रीय झाली आहे. कंगना गेल्या काही दिवसांपासून ट्वीटरच्या माध्यमातून नवनवीन खुलासे करताना दिसत आहे. मात्र, कंगना राणौत हिने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यामुळे आता सोशल मीडियावर तिच्यावर टीकेचा भडिमार सुरु झाला आहे. तसेच मराठी कलाकरांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. रितेश देशमुख (Riteish Deshmukh), केदार शिंदे (Kedar Shinde), स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), स्वरा भास्कर (Swara Bhaskar) यांनी कंगनाच्या ट्विटला रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सतत मत मांडणाऱ्या कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. कंगनाने महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावले होते. त्यानंतर कंगना रनौतने एक ट्विट केले आहे. ज्यात असे म्हटले आहे की, “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नये असे म्हटले. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असं कंगना म्हणाली आहे. कंगनाच्या वक्तव्यानंतर सर्वसामान्यांपासून तर, अनेक राजकीय नेते आणि कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. हे देखील वाचा- आमिर खानचे मराठी शिक्षक व भाषेचे अभ्यासक सुहास लिमये यांचे निधन; अभिनेत्याने भावनिक पोस्टद्वारे व्यक्त केल्या भावना (View Tweet)

रितेश देशमुखचे ट्विट-

केदार शिंदेचे ट्विट-

स्वप्नील जोशीचे ट्विट-

स्वरा भास्करचे ट्विट-

हेमंत ढोमे यांची फेसबूक पोस्ट-

सुशांच्या मृत्यूनंतर सोशल मीडिया नवनवीन खुलासे करणारी कंगणा आता वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे दिसत आहे. मुंबईबाबत केलेल्या ट्विटमुळे अनेकांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे.