लॉकडाउन मधील तणाव दूर करण्यासाठी लता मंगेशकर यांनी शेअर केला भाचीचा मजेशीर किस्सा
त्यावर तिने 'परदे मे रेहने दो परदा ना उठाओ' हे गाणे ऐकत असल्याचे उत्तर दिले आहे.
सध्या देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाउनचे आदेश येत्या 3 मे पर्यंत कायम ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय सरकराने घेतला आहे. तसेच नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. यामुळे दिवसभर घरात बसून बसून कंटाळलेली लोक स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी विविध गोष्टी करत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभुमीवर प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या भाचीला कोणती तरी विचारले की या सध्याच्या तणावापूर्ण वातावरणात चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी कोणते गाणे ऐकते. त्यावर तिने 'परदे मे रेहने दो परदा ना उठाओ' हे गाणे ऐकत असल्याचे उत्तर दिले आहे.
लता मंगेशकर यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे, भाची रचना हिला सध्याच्या ताणावाच्या वातावरणात आनंदित राहण्यासाठी काय करत असे विचारले असता तिने कोणते गाणे ऐकते त्या संदर्भात उत्तर दिले आहे. लता मंगेशकर सोशल मीडियात एखाद्या घटनेबाबत आपले मत व्यक्त करताना दिसून येतात. तर काही दिवसांपूर्वी सुद्धा लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आण प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री घरातच रहा असे आवाहन करत आहेत त्याचे पालन करावे असे म्हटले होते.(दूरदर्शनवर आता बालकांचे मनोरंजन करण्यासाठी छोटा भीम भेटीला, 'या' वेळी होणार प्रक्षेपण)
दरम्यान, लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर रामायण, महाभारत या मालिका सुरु करण्यात याव्या अशी मागणी प्रेक्षकांकडून होऊ लागली. चॅनेलकडून या मागणीची पूर्तता करण्यात आली. त्यानंतर चाणक्य, शक्तीमान, श्रीमान श्रीमती या जुन्या लोकप्रिय मालिका सुरु करण्यात आल्या. त्यामुळेच जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.