Money Heist Season 5 Leaked Online: मनी हाईस्टचा सीझन 5 प्रदर्शनानंतर अवघ्या तासांमध्ये झाला ऑनलाइन लीक; TamilRockers आणि Telegram चॅनेल्सवर उपलब्ध आहे सिरीजची HD Print
Money Heist Season 5 (Photo Credits: YouTube)

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, अखेर मनी हाईस्ट सीझन 5 (Money Heist Season 5) जगभरातील नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. चार यशस्वी सिझन्सनंतर, आता हा पाचवा आणि शेवटचा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये 10 भाग असणार आहेत. शेवटच्या सिझनमध्ये बँक ऑफ स्पेनमध्ये टोळीच्या सुरू असलेल्या दरोड्याच्या शेवट काय होतो हे पाहायला मिळत आहे. सिझनचे रिव्ह्यू सोशल मिडियावर व्हायरल होत आहे व त्यावरून सिझन 5 हा यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. अशा प्रकारे सर्वत्र 'मनी हाईस्ट'चा उदोउदो चालू असताना दुर्दैवाने ही सिरीज ऑनलाइन लीक झाली आहे.

नेटफ्लिक्सवर ही सिरीज प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये ती टोरेंट साइटवर उपलब्ध झाली आहे. तसेच ऑनलाईन पाहण्यासाठी सिझनची एचडी प्रिंटही उपलब्ध आहे. मनी हाईस्ट सीझन 5 हा Filmywap, Onlinemoviewatches, 123movies, 123movierulz, Filmyzilla अशा अनेक साईट्सवर पाहण्यासाठी उपलब्ध झाला आहे.

ही सिरीज पाहण्यासाठी जे कीवर्ड ऑनलाईन मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत, त्यामध्ये Money Heist Season 5 2021 Series Download, Money Heist Season 5 Tamilrockers, Money Heist Season 5 Tamilrockers HD Download, Money Heist Season 5 Download Pagalworld, Money Heist Season 5 Download Filmyzilla, Money Heist Season 5 Series Download Openload, Money Heist Season 5 Series Download Tamilrockers अशा काहींचा समावेश आहे. (हेही वाचा: या महिन्यात ओटीटीवर असणार मनोरंजनाची दिवाळी; Money Heist 5 पासून ते 'भूत पोलीस' पर्यंत प्रदर्शित होत आहेत अनेक फिल्म्स व सिरीज)

ही पहिलीच वेळ नाही जिथे एखादी लोकप्रिय सिरीज अथवा चित्रपटाची पायरसी झाली आहे. नुकतेच अक्षय कुमारचा 'बेल बॉटम' हा चित्रपट कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनंतर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्रातील सिनेमागृहे बंद असूनही निर्मात्यांनी लॉकडाऊननंतर चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. पण रिलीज झाल्यानंतर काही तासांनीच 'बेल बॉटम' ऑनलाईन लीक झाला होता.