Jumanji The Next Level Trailer: 'द रॉक' च्या जबरदस्त अॅक्शनचा खजाना घेऊन आलाय या चित्रपटाचा ट्रेलर
'जुमानजी: द नेक्स्ट लेवल' (JUMANJI The Next Level) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये खूपच चित्तथरारक आणि रोमांचित करणारे सीन्स आपल्याला पाहायला मिळतील.
लहानांपासून मोठ्या पर्यंत हॉलिवूडचा आवडता चित्रपट म्हणजे जुमानजी. या चित्रपटाचे याआधीचे भागही लोकांच्या पसंतीस उतरले होते. तसेच काहीसे किंबहुना त्याहून अधिक रोमांचकारी अनुभव देईल असा 'जुमानजी: द नेक्स्ट लेवल' (JUMANJI The Next Level) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये खूपच चित्तथरारक आणि रोमांचित करणारे सीन्स आपल्याला पाहायला मिळतील.
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जुमानजी खेळाच्या पुढील स्तराची झलक दाखविण्यात आली आहे. या सिक्वेलमध्ये 2017 मध्ये आलेल्या 'जुमांजी:वेलकम टू दी जंगल' या चित्रपटानंतरची गोष्ट दाखविण्यात आली आहे.
मात्र या चित्रपटात तुम्हाला एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे या खेळाचे मुख्य खिलाड्यांचे दादा (डेनी डेविटो आणि डेनी ग्लोवर) जॉनसन आणि हार्ट चे अवतारात खेळात सामील होणार आहे.
थोडक्यात 'जुमांजी: द नेक्स्ट लेवल' मध्ये जुनी गँग परत आली आहे, मात्र या वेळेला खेळ बदलला आहे. 'जुमांजी: द नेक्स्ट लेवल' या चित्रपटाचे दिग्दर्शन जेक कसदन यांनी केले आहे. या चित्रपटात निक जोनस, मैडिसन इसमैन आणि मॉर्गर टर्नर सुद्धा आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 03, 2019 04:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

