![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/09/Cardi-B-380x214.jpg)
जगप्रसिद्ध रॅपर कार्डी बी (Cardi B) हिने सेक्स (Sex) करताना आनंद घेण्याची एक हटके पद्धत सांगितली आहे. 'बोडक येलो' यांसारखे अनेक प्रसिद्ध म्यूझिक व्हिडिओ देणारी गायिका कार्डी बी हिने रविवारी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने थेट खुलासा केला आहे की, तिला कशा वातावरणात सेक्स करायला आवडतो. एसशोबिज डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार कार्डी बी हिने या व्हिडिओत स्पष्टपणे म्हटले आहे की, तिला टीव्ही पाहात सेक्स करायला प्रचंड आवडते.
कार्डी बी हिला अंधाराची प्रचंड भीती वाटते. तिने म्हटले हे की, सेक्स करताना जेव्हा प्रकाश असतो तेव्हा ती आपल्या जोडीदाराचा चेहरा स्पष्ट पाहू शकते. तसेच, स्वत:चाही चेहरा पाहू शकते. पण, अंधारात सेक्स करताना मी त्याकडे फार लक्ष देऊ शकत नाही. अंधाऱ्या वातावरणात मला प्रचंड भीती वाटते. टीव्हीच्या प्रकाशात आपण खूपच सुंदर दिसतो. सेक्स करताना आनंद मिळविण्याचा हा एक चांगला मार्ग आहे, असेही कार्डी बी म्हणते. (हेही वाचा, अबब! मॅडोना, बियॉन्से ला मागे टाकत Rihanna बनली जगातील सर्वात श्रीमंत महिला गायक; जाणून घ्या एकूण संपती)
दरम्यान, 'आय लाइक इट' ची रॅपर कार्डी बी हिने आणखी एक व्हिडिओ शेअर करत आपल्या कृत्रिम शरीरावर टीका करणाऱ्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले. 26 वर्षीय रॅपर कार्डी बी हिने सत्य स्वीकारले आणि शेअरही केले आहे की तिने कॉस्मेटिक सर्जरी केलीआहे. मात्र, काही लोक आहेत जे कार्डी बी हिच्या कृत्रिम शरीरयष्टीवर टीका करतात.