Holi Song 2020: आसिम रियाझ आणि जॅकलीन फर्नांडिसचं होळी स्पेशल गाणं प्रदर्शित: पहा व्हिडिओ
या गाण्यात आसिम आणि जॅकलीन या दोघांची जोडी प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळत आहे.
Holi Song 2020: बिग बॉस 13' चा उपविजेता आसिम रियाज (Asim Riaz) आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचं (Jacqueline Fernandez) गाणं 'मेरे अंगने मे' (Mere Angne Mein) होळीच्या निमित्ताने आज रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यात आसिम आणि जॅकलीन या दोघांची जोडी प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळत आहे.
या गाण्यात इसवी सन 1435 आणि 2020 या वर्षातील वेगवेगळ्या कल्पना दाखवण्यात आल्या आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला जॅकलीन एका राजकुमारीप्रमाणे हातात धनुष्य बाण घेऊन उभी असलेली पाहायला मिळत आहे. जॅकलीन असीमच्या पर्सनालिटीकडे पाहून प्रभावित होते आणि त्याच्या प्रेमात पडते. हे गाणं म्युझिक कंपनी टी-सीरीजने ट्विटरवर शेअक केलं आहे. (हेही वाचा - स्टार किड्स सुहाना खान ने आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट केलं पब्लिक; पहा शाहरुख खानच्या लाडक्या लेकीचे हटके फोटोज)
'मेरे अंगने मे' हे रिमिक्स गाणं नेहा कक्कर आणि राजा हसन यांनी गायलं आहे. या गाण्याचं संगीत तनिष्क बागचीने रिक्रिएट केल आहे. तसेच राधिका राव आणि विनय सपरु यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. या गाण्यात जॅकलीन आणि आसीमसोबत अनुज सैनी आणि खुशी जोशीही पाहायला मिळत आहेत.
'मेरे अंगने मे' हे गाणं बिग बी यांच्या 'लावारिस' या सिनेमातील 'मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है' या गाण्याचं रिमिक्स वर्जन आहे. तेव्हा या गाण्याला आमिताभ यांनी स्वतः आवाज दिला होता. आजही अमिताभ यांच हे गाणं त्यांच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. असीम आणि जॅकलीनच्या या रिमिक्स गाण्यालाही चाहत्यांनी लाईक तसेच कमेंट्स केल्या आहेत.