स्टार किड्स सुहाना खान ने आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट केलं पब्लिक; पहा शाहरुख खानच्या लाडक्या लेकीचे हटके फोटोज
Suhana Khan (PC - Instagram)

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची (Shah Rukh Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) बॉलिवूड डेब्यू करणार आहे, अशी अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. सुहानाचे कोणतेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुहानाच्या नावाचे अनेक फॅन पेज आहेत. ज्यावर सुहानाचे लेटेस्ट फोटो पाहायला मिळत असतात.

बॉलिवूडमधल्या अनेक स्टार किड्सचे इन्स्टाग्राम अकाऊंट पब्लिक आहे. परंतु, आतापर्यंत सुहानाचे इन्स्टाग्राम अकाऊंट पब्लिक नव्हते. मात्र, आता सुहानाने आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट पब्लिक केलं आहे. त्यामुळे सुहानाच्या चाहत्यांना तिने शेअर केलेले खास फोटो पाहता येणार आहेत. (हेही वाचा - Baaghi 3 Box Office Collection: टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांच्या 'बागी 3' सिनेमाची दमदार कमाई; पहिल्याच विकेंडला 50 कोटींचा गल्ला)

 

View this post on Instagram

 

🥺

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

 

View this post on Instagram

 

💔👩‍🎓💔

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

 

View this post on Instagram

 

Birthday boy ❤️

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

तुम्हीही सुहानाचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिलं तर तुम्हालाही ते पब्लिक झालेलं पाहायला मिळेल. सुहानाने आतापर्यंत आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 21 पोस्ट केल्या आहेत. सुहानाने आपल्या अकाऊंटवर कुटुंबातील सदस्यांसोबत फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे सुहानाने या अकाऊंटवरून शाहरुख खानसोबतचा एकही फोटो शेअर केलेला नाही. सुहाना 2017 पासून इन्स्टाग्रामवर अक्टिव्ह आहे. तिने इन्स्टाग्राम बायोमध्ये “So I can be like you”, असं म्हटलं आहे. सुहानाचे इन्स्टाग्रामवर 132 हजार फॉलोअर्स आहेत. तिने आतापर्यंत 897 अकाउंट्स ला फॉलो केलं आहे.