Gully Boy चित्रपटाच्या साऊथ रिमेकमधून 'हा' अभिनेता साकारणार स्ट्रिट रॅपरची भुमिका
तर रिमेकमध्ये साऊथचा 'हा' अभिनेता स्ट्रिट रॅपरची भुमिका साकारणार आहे.
यंदाच्या व्हेलेंटाईन डे (Valentine's Day) च्या दिवशी प्रदर्शित झालेल्या गली बॉय हा चित्रपट प्रेक्षकांच्या खुपच पसंदीस पडत आहे. तसेच अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) या दोघांनी अतिशय यशस्वीपणे या चित्रपटातून आपल्या भुमिकांना न्याय दिला आहे. मात्र आता 'गली बॉय' (Gully Boy) या चित्रपटाचा साऊथ भाषेत रिमेक येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तर रिमेकमध्ये साऊथचा 'हा' अभिनेता स्ट्रिट रॅपरची भुमिका साकारणार आहे.
तेलगू निर्माते अल्लू अरविंद गली बॉयचा रिमेक बनवणार आहेत. तर स्ट्रिट रॅपच्या भुमिकेला साऊथ भाषेत न्याय देण्यासाठी अभिनेता साई धर्म तेज (Sai Dharam Tej) हा स्ट्रिट रॅपरची भुमिका साकारणार आहे. मात्र अद्याप या भाषेतून गली बॉय चित्रपट साऊथ भाषेत येईल हे अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. परंतु या बाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. (हेही वाचा-प्रदर्शनानंतर एका दिवसात तमिळ रॉकर्सकडून ‘गली बॉय’ लीक; पाहा काय आहे पहिल्या दिवसाची कमाई )
तत्पूर्वी कित्येक मोठ्या वृत्तवाहिन्यांनी, वर्तमानपत्रांनी तसेच समीक्षकांनीही या चित्रपटाची स्तुती केली आहे. मात्र प्रदर्शनानंतर काही तासांतच हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला असल्याचे बोलले जात होते. पायरसी करणारी देशातील सर्वात मोठी वेबसाईट तमिळ रॉकर्स (TamilRockers) कडून हा चित्रपट लीक झाला. यामुळे आता चित्रपटाच्या व्यवसायावर या गोष्टीचा चांगलाच परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती.