Farhan Akhtar लवकरच झळकणार Marvel Studios सोबत एका आंतरराष्ट्रीय कलाकृतीमध्ये, Bangkok मध्ये शुटिंग सुरू - रिपोर्ट्स

तो काही दिवसांपूर्वीच मुंबई हून बॅंकॉंकला रवाना झाला आहे.

Farhan Akhtar (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड कलाकारांनी इंटरनॅशनल प्रोजेक्ट मध्ये काम करणं हे काही नवीन नाही. सध्या फरहान अख्तर हा लवकरच इंटरनॅशन स्तरावर झळकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. IANS वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, फरहान हा मार्वल स्टुडिओच्या (Marvel Studios) एका प्रोजेक्टचा भाग आहे. दरम्यान डिस्नी ने देखील याबाबत बोलणं टाळलं आहे. पण फरहान सध्या बॅंकॉंक (Bangkok) मध्ये चित्रीकरण करत असल्याची माहिती आहे. या इंटरनॅशनल प्रोजेक्टबाबत फरहान कडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तो काही दिवसांपूर्वीच मुंबई हून बॅंकॉंकला रवाना झाला आहे.(फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर लवकरच अडकणार लग्नबंधनात?; जाणून घ्या Javed Akhtar यांची प्रतिक्रिया).

मार्वल स्टुडिओ हा Marvel Cinematic Universe films च्या निर्मितीचा भाग आहे. यापूर्वी त्यांनी अ‍ॅव्हेंजर्स, स्पायडरमॅन, डॉक्टर स्ट्रेंज असे अनेक सिनेमे केले आहेत. या सिनेमांना जगभरातून तुफान प्रसिद्ध मिळालेला आहे. मात्र नव्या प्रोजेक्ट बाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.  नक्की पहा: Toofaan Official Teaser: फरहान अख्तर याच्या 'तुफान' सिनेमचा टीझर आऊट (Watch Video).

बॉलिवूड मध्ये सध्या फरहान अख्तर हा 'तुफान' सिनेमाचा भाग आहे. या सिनेमामध्ये तो बॉक्सरच्या भूमिकेमध्ये आहे. लवकरच तो सिनेमा प्रदर्शित होणार आहे. राकेश मेहरा या सिनेमाचा दिग्दर्शक आहे. यापूर्वी फरहान ने 2003 मध्ये राकेश मेहरा सोबत 'भाग मिल्खा भाग' सिनेमामध्ये झळकला होता. दरम्यान स्काय इज पिंक हा त्याचा शेवटचा प्रसिद्ध झालेला सिनेमा आहे. काही दिवसांपूर्वीच तुफानचा टीझर प्रसिद्ध झाला आहे. त्याला चाहत्यांनी आणि बॉलिवूड मधूनही प्रेम मिळालेले आहे.