Most Popular Stars India Loves: सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रीच्या यादीत दीपिका पादुकोण अव्वल; येथे पाहा संपूर्ण यादी

महत्वाचे म्हणजे, गेल्यावर्षी या यादीत दिपिका अव्वल स्थानीच होती.

Deepika Padukone (Photo Credits: Instagram)

Most Popular Stars India Loves: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हीने पुन्हा एकदा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रीच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्यावर्षी या यादीत दिपिका अव्वल स्थानीच होती. दिपिका गेल्या 13 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. दीपिकाने आपल्या अभिनयाच्या जोरादार स्वत:चा खूप मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. एवढेच नव्हेतर, तिला बॉलिवूडची द रायजिंग क्वीन देखील म्हंटले जाते.

अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर दीपिका आगामी काळात बर्‍याच मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे, त्यातील एक अभिनेता प्रभास बरोबरचा नाग अश्विनचा पुढचा चित्रपट आहे. याशिवाय, ती ‘द इंटर्न’ या चित्रपटातही झळकणार आहे. याचबरोबर दीपिकाने नुकताच हृतिक रोशनसोबत तिची पुढची अ‍ॅक्शन-फिल्म 'फाइटर' ची घोषणा केली आहे. हे देखील वाचा- India Lockdown: भारतामधील लॉकडाऊन मोठ्या पडद्यावर, मधुर भांडारकर बनवणार चित्रपट; सई ताम्हणकर, प्रतिक बब्बर साकारणार भूमिका

इंस्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

एक पाठोपाठ सुपरहिट चित्रपट करणारी दीपिका लवकरच क्रिकेटपटू कपिल देव यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट '83' मध्ये रणवीर सिंहसोबत दिसणार आहे. या चित्रपटात दोघेही लग्नानंतर प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत. हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोना संकटामुळे हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही.